वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ईशान्य भारताला केंद्रातील मोदी सरकारने विकासाची मोठी भेट दिली आहे. नागालँडमध्ये मोठ्या राष्ट्रीय महामार्गाचे उदघाटन तसेच १४ राष्ट्रीय महामार्गांची पायाभरणी करण्यात आली. modi sarkar news
सध्या डोंगर ते मैदानापर्यंत रस्ते व महामार्गांचे काम सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागालँडमधील मोठ्या राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन झाले. त्याशिवाय त्यांनी इतर 14 राष्ट्रीय महामार्गांचा पायाही घातला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पांची एकूण किंमत अंदाजे 4,127 कोटी रुपये आहे. गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या प्रकल्पांचे उद्घाटन केले. या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची लांबी सुमारे 266 किमी असेल. या वेळी नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रियो देखील उपस्थित होते. modi sarkar news
वेळी केंद्रीय मंत्री म्हणाले की, केंद्र सरकार ईशान्य व नागालँडच्या विकासासाठी वचनबद्ध आहे. नागालँडमधील राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कमध्ये गेल्या 6 वर्षात 667 किमीचे रस्ते जोडले गेले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. ही सुमारे 76 टक्के वाढ आहे. राज्यात सध्या राष्ट्रीय महामार्ग नेटवर्क 1,547 किमीचा आहे. 2014 मध्ये तो 880.68 किमी होता.
6 वर्षात 55 कामे मंजूर
गडकरी म्हणाले की, मागील 6 वर्षांत नागालँडमधील राष्ट्रीय महामार्गांच्या विकास आणि सुधारणासाठी एकूण 1063.41 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची 55 कामे मंजूर झाली आहेत. यामध्ये दिमापूर प्रकल्पातील सुधारणांच्या भागासाठी सुमारे 48 किलोमीटरच्या 3 रस्त्यांचा समावेश असून त्यासाठी एकूण 1,598 कोटी रुपये खर्च येणार आहे.
दिमापूर-कोहिमा रस्त्यावर काम सुरू आहे. नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रियो यांनी केंद्रीय मंत्र्यांना विनंती केली की, ‘राज्यातील पायथ्यावरील रस्त्यांच्या विकासाचा विचार करावा.’ नागालँडची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणार्या दिमापूर-कोहिमा रस्त्याचा प्रश्नही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. त्यावर नितीन गडकरी म्हणाले की, ‘काम सुरू आहे आणि या रस्त्याचे 70-80 टक्के काम पूर्ण झाले आहे.’
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App