विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाचा सर्वोच्च मिलिट्री सन्मान लीजन ऑफ मेरिट (Legion of Merit) ने सन्मानित केले आहे. मोदींना हे अवॉर्ड भारत-अमेरिकेचे रणनीतिक संबंध वाढवण्यासाठी देण्यात आला. मोदींच्या वतीने हा सन्मान अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत तरणजीत सिंह संधू यांनी स्वीकारला.
Modi receives Legion of Merit from US
ट्रम्प यांच्या वतीने हे पदक अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी दिले. अमेरिकेचा हा पुरस्कार केवळ एखाद्या देशाच्या किंवा सरकारच्या प्रमुखांना दिला जातो. मोदींसह हा पुरस्कार जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनाही देण्यात आला.
मोदींच्या नेतृत्वात त्यांचा देश ग्लोबल पॉवर बनत आहे. त्याचबरोबर अमेरिकेसमवेत धोरणात्मक भागीदारी वाढवण्यात आणि जागतिक आव्हानांचा सामना करण्यात भारताच्या पंतप्रधानांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तर आबे यांना पॅसिफिकमध्ये सुरक्षितता राखण्यासाठी आणि मॉरिसन यांना ग्लोबल चॅलेंजसवर यशस्वीरित्या मात करण्यासाठी हा सन्मान देण्यात आला आहे.
20 जुलै 1942 रोजी अमेरिकन संसदेने लिजन ऑफ मेरिट मेडलची सुरुवात केली. हे अवॉर्ड अमेरिकेतील सैनिकांव्यतिरिक्त विदेशातील अशा सैनिकांना आणि राजकारण्यांनाही दिला जातो. ज्यांनी असाधारण सेवा दिल्या आहेत.
मोदींना चार वर्षात मिळालेले सन्मान पंतप्रधान मोदींना 2016 मध्ये ऑर्डर ऑफ अब्दुलअजीज अल सऊद (सऊदी अरब), 2016 मध्येच स्टेट ऑर्डर ऑफ गाजी अमीर अमानुल्ला खान, 2018 मध्ये ग्रँड कलर ऑफ द स्टेट ऑफ पेलेस्टाइन अवॉर्ड, 2019 मध्ये ऑर्डर जायद अवॉर्ड (UAE), 2019 मध्ये ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू (रशिया) आणि याच वर्षी ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रुल ऑफ निशान इजुद्दीन (मालदीव) ने सन्मानित करण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App