पोलिओ, धनुर्वात, काविळीच्या लसीसाठी भारत थांबला होता 3 दशके; कोरोना लस आली वर्षात


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यतत्परतेमुळेच देशात अतिजलद म्हणजे जगाच्या तुलनेत एका महिन्यात कोरोनाविरोधी लस तयार झाली आहे. या उलट काँग्रेसच्या राजवटीत लसनिर्मितीच्या नावाने शंख असून अनेक शतके लोटल्यानंतर अनेकांना म्हातारपणात लस मिळाली असावी, अशीच एक आकडेवारी सांगत आहे. Modi produces vaccines in a month in the country, zero production during the Congress regime; Many are vaccinated in old age

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात विविध लसी जगात केव्हा तयार झाल्या आणि भारतात केव्हा पोचल्या. याचा तपशील मांडला. विशेष म्हणजे जगात डिसेंबर 2020 मध्ये पहिली कोरोनाविरोधी लस तयार झाली. तेव्हा जानेवारी 2021मध्ये केवळ एका महिन्यात भारताने लस तयार केली होती. यामागे केंद्र सरकारच्या अतिजलद निर्णय घेण्याची प्रचिती आली. परंतु, मोदी यांच्या पूर्वी असलेल्या काँग्रेसच्या राजवटीत वर्षानुवर्षे भारतात जीवनरक्षक लसी पोचल्याच नसल्याची आकडेवारी सांगत आहे.
या उलट देशात काही अंतराने एकापाठोपाठ दोन कोरोनाविरोधी लस तयार झाल्या. त्यामध्ये कोव्हिशिल्ड आणि कोव्हक्सीन या लसीचा समावेश आहे. देशातील कोट्यवधी लोकांना लसीचे डोस दिले असून कोविशिल्डची निर्यातही भारताने केली आहे.

लसींचा इतिहास आणि केव्हा भारतात आल्या

  • रोटाव्हायरस लस जगात1998 मध्ये तयार झाली आणि भारतात 2015 मध्ये पोचली.
  • जे एन्सेफलायटीस 1930 चे दशकात तयार झाली आणि भारतात पोचेपर्यंत 2013 उजाडले.
  • हिपॅटायटीस बी 1982 मध्ये तयार झाली आणि भारतात 2002मध्ये पोचली.
  • पोलिओची लस जगात 1955 मध्ये तयार झाली आणि भारतात पोचायला 1978 वर्ष उजाडले.
  • टिटॅनस जगात 1924 मध्ये तयार झाली आणि भारतात 1978 साली पोचली.
  • या उलट कोरोनाविरोधी लस जगात डिसेंबर 2020 मध्ये तयार झाली. पण, भारतात पुढील महिन्यात म्हणजेच जानेवारी 2021 मध्ये तयार झाली.

केवळ सहा महिन्यात लसीकरण- निर्यातही

विशेष म्हणजे केवळ सहा महिन्यात भारतात दोन लसी तयार झाल्या होत्या. केंद्र सरकारने लस तयार करण्यासाठी कंपन्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे भारतात वर्क महिन्यात लस तयार झाली. त्यामुळे मोदी सरकारलाच लस निर्मितीसाठी 100 टक्के श्रेय दिले पाहिजे. अन्यथा जगात वर्षानुवर्षे लोटली तरी भारतात लसी पोचल्या नव्हत्या आणि त्या तयार झाल्या नव्हत्या. हे विविध लसीच्या इतिहासावरून स्पष्ट होत आहे.

Modi produces vaccines in a month in the country, zero production during the Congress regime; Many are vaccinated in old age

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात