राणा दांपत्य आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना यांच्या राजकीय भांडणाच्या एपिसोड मध्ये जेवढी कॅरेक्टर्स मुंबईतल्या राजकीय स्टेजवर झुंजताना दिसली, ती तेवढीच नाहीत किंबहुना या दोघांच्यात भांडण झुंजवून प्रत्यक्ष “खेळून” घेणारे खेळाडू वेगळेच आहेत, हे राजकीय इंगित आहे…!!Modi – Pawar: Named after Savar; Thackeray – Improve your image by making Rana quarrel
काल दिवस-रात्र सगळ्या मीडियाचा फोकस मुंबईतल्या शिवसेना आणि राणा दांपत्याच्या झुंजत्या भांडणावर केंद्रित झाला असला तरी दोन “खेळणाऱ्या” कॅरेक्टर्सवर माध्यमांचे दुर्लक्ष झाले.
इकडे मुंबईत राणा दांपत्य आणि शिवसैनिक एकमेकांशी झुंजत होते आणि तिकडे कोल्हापुरात शरद पवार राष्ट्रवादीच्या संवाद सांगता मेळाव्यात सत्ता नीट राबवावी. सत्तेचा माज करू नये, असे संवाद मोदी सरकारला उद्देशून “लेकी बोले सुने लागे”, अशा थाटात उच्चारुन घेत होते…!! शरद पवारांच्या भाषणाच्या बातम्या काही माध्यमांनी जरूर चालवल्या… पण यातला “लेकी बोले सुने लागे”चा अँगल माध्यमांकडून निसटला…!!
मूळात राष्ट्रवादीचा संवाद सांगता मेळावाच सायंकाळी असल्याने दिवसभर फक्त राणा दांपत्य आणि शिवसेना संघर्षाच्या बातम्या चालल्या. यामुळे राष्ट्रवादीच्या सांगता मेळाव्यातील भाषणांकडे तुलनेने दुर्लक्ष झाले. परंतु, प्रत्यक्षात यातून नेमके काय झाले तर मीडियामध्ये राणा दांपत्याशी संघर्षाच्या मुद्द्यावर शिवसेनेची नकारात्मक प्रतिमा उभी राहिली. त्याच वेळी राष्ट्रवादीची मेळाव्याच्या निमित्ताने सकारात्मक प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न झाला…!! तसेच राणा दाम्पत्यांना नेमके उचकवले कोणी हा विषय माध्यमांकडून पूर्णपणे दुर्लक्षित राहिला.
मुद्दा मनसेचा पण ताकद राष्ट्रवादीचे
राणा दाम्पत्याने उचललेला हनुमान चालीसाचा मुद्दा जरी राज ठाकरे यांनी आधी लावून धरला होता तरी देखील एक भाग विसरता कामा नये ती म्हणजे नवनीत राणा या निवडून येताना राष्ट्रवादी पुरस्कृत खासदार होत्या. 2019 नंतरचे वारे बघून त्यांनी आपली भूमिका मोदी सरकारला अनुकूल करून घेतली. परंतु नवनीत राणा यांनी हनुमान चालीसाचा मुद्दा उचलण्यापूर्वी शरद पवारांचा अमरावती दौरा झाला होता हे विसरून चालणार नाही. अमरावती दौर्यात नवनीत राणा शरद पवारांबरोबर उघडपणे तर दिसल्याच पण आपण शरद पवारांमुळे निवडून आलो हे सांगायला देखील त्या विसरल्या नाहीत…!! हा मुद्दा यातील सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा आहे…!!
करने को पवार भरने को शिवसेना!!
शिवसेने विरुद्धच्या सर्व संघर्षात राणा दांपत्याने नेमके काय मिळवले असेल तर अमरावती जिल्ह्यातल्या आपल्या बालेकिल्ल्याचे मजबुतीकरण करून घेतले. अर्थातच हे मजबुतीकरण कोणाविरुद्ध आहे??, हे सांगायला फार मोठ्या राजकीय तज्ञाची गरज नाही. हे मजबुतीकरण अर्थातच अमरावतीतल्या शिवसेने विरुद्ध आहे म्हणजे शरद पवारांच्या बळावर निवडून येऊन अमरावतीत राणा दांपत्य शिवसेनेला खच्ची करत आहे…!! मग भले त्यांनी मुद्दा हिंदुत्ववादी पक्षांचा उचललेला का असेना… याचा लाभ परोक्ष रूपात पवारांनी निवडून आणलेल्या राणा कुटुंबाला होताना दिसतो आहे आहे…!!
हे झाले राणा आणि शिवसेना संघर्षाचे जळीत लळीत. यात मुद्दा जरी हनुमान चालीसा या विषयाचा असला तरी तो उचलणारे राणा दांपत्य आतून पवार समर्थक आहे. म्हणजे एक प्रकारे “खेळणारा” घटक हे पवार आहेत…!! त्यांनी कोल्हापूर मधून राष्ट्रवादीचा संवाद सांगता मेळावा घेत आपले प्रतिमा वर्धन करून घेतले आहे.
मोदी आज मुंबईत
असेच प्रतिभा वर्धन आज मुंबईत आणखी एका महानेत्याचे होणार आहे… पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी येणार आहेत. हा कार्यक्रम अराजकीय आहे. यामध्ये स्वतः पंतप्रधान मोदी कदाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह असतील. मंगेशकर कुटुंबियांचा हा कार्यक्रम आहे. पण प्रत्यक्षात प्रतिमा वर्धन मोदींचे होणार आहे…!! मोदींनी हिंदुत्वाचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर लावून धरला असताना महाराष्ट्रात मात्र हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरणारा प्रादेशिक पक्ष त्यांना खचवायचा आहे, असे दिसते आहे. यासाठीच मोदींच्या पक्षाने स्थानिक पातळीवर राज ठाकरे आणि राणा दांपत्य यांना उचवलेले दिसते.
याचाच अर्थ मुंबईच्या रस्त्यावर झुंजणारे जरी राणा दांपत्य आणि शिवसैनिक असले तरी प्रत्यक्षात “खेळणारे” मोदी – पवार आहेत आणि यामध्ये झुंजणाऱ्या शिवसेनेची प्रतिमा मलीन करण्यात राणा दांपत्य त्यांना मदत करत आहे… एक हिंदुत्ववादी पक्ष या जाळ्यात अडकला आहे हे सर्वात मोठे दुर्दैव आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App