मोदी सरकारचा शेतकऱ्यांना आणखी दिलासा.. कांदा निर्यातीला परवानगी


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्याने शेतमालाला कवडीमोल भाव मिळत होता. सप्टेंबरमध्ये शेतमालाला योग्य भाव मिळायला लागले असताना केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बाजारपेठेतील कांद्याचे दर स्थिर होत आहे, हे पाहताच पुन्हा कांदा निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. Modi government’s further relief to farmers Onion export allowed

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्याने शेतमालाला कवडीमोल भाव मिळत होता. सप्टेंबरमध्ये शेतमालाला योग्य भाव मिळायला लागले असताना केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता.

यानंतर, राज्यातील शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सप्टेंबरमध्ये कांद्याला प्रतिकिलो ४० रुपयांचा भाव मिळताच, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी देखील सुरू झाली होती. यामुळे शेतकरी प्रचंड आक्रमक होऊन रस्त्यावर देखील उतरले होते.

Modi government’s further relief to farmers Onion export allowed

सध्या, दिल्लीच्या सीमेवर नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबचे शेतकरी आक्रमक झाले असतानाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारीपासून कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांचा २०२० चा शेवट या गोड बातमीने होणार आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण