वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मॉडर्ना कंपनीची सिंगल डोसची लस पुढील वर्षी भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याबाबत भारतातील सिप्लासह अन्य कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. अमेरिकेतील फायझर कंपनी भारताला पाच कोटी डोस देण्यास तयार आहे.Moderna company’s single dose vaccine Will be available in the country next year
भारतात सध्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हक्सीन या भारतीय लासीद्वारे लसीकरण सुरु आहे. कोट्यवधी डोस दिले गेले असून कोव्हिशिल्ड निर्यात केली आहे. आता देशात लसीचा तुटवडा जाणवत आहे. कोरोना रोखण्यासाठी लसीकरण अतिआवश्यक आहे. त्यामुळे टंचाई दूर करण्यासाठी परदेशी लाशीना भारतात परवानगी दिली आहे.
त्या अंतर्गत रशियाच्या स्पुटनिक या लशीची भारतात आयात सुरु झाली आहे. त्यानंतर अनेक कंपन्यांनी लाशीच्या निर्यातीसाठी करार सुरु केले आहेत. त्या द्वारे लसी भारतात येण्यास सुरुवात होईल. आता पुढील वर्षी मॉडर्नाची सिंगल डोस लस उपलब्ध होणार आहे.
परदेशी लसीची गरज का भासली
लसनिर्मितीत अडचणी या युरोप- अमेरिकेतून कच्चा माल रोखल्याने आल्या आहेत. लस तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल रोखला तर लस कशी तयार होणार, असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे भारतात लस उत्पादन बंद पडून लसीकरण मोहीम थंडावली आहे. अमेरिकेने बंधने शिथील करण्याची घोषणा केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App