विशेष प्रतिनिधी
मुंबई : नाशिक येथील मनपा रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत २२ निष्पाप रुग्णांचे जीव गेले. नाशिकच्या या दुर्घटनेवर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. राज ठाकरे यांनीही या दुर्घटनेवर भाष्य करत शोकमग्न असल्याचं म्हटलं आहे. MNS Raj Thackeray Reaction on Nashik Hospital Oxygen Leakage Incident
नाशिकच्या दुर्घटनेवर भाष्य करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला
ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं. — Raj Thackeray (@RajThackeray) April 21, 2021
ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं.
— Raj Thackeray (@RajThackeray) April 21, 2021
ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘गेल्या २ महिन्यांतील आठवी घटना‘
नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेली घटना प्रचंड धक्का देणारी आणि ह्रदयद्रावक आहे. ऑक्सिजन टाकीला गळती लागून आत्तापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यांतील ही आठवी घटना आहे. कुठं शॉर्ट सर्कीट होतं, कुठं लहान मुलांच्या हॉस्पीटलमध्ये मुलं दगावतात. तातडीने या घटनेची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. रुग्णालयातील इतर रुग्णांच्या शिफ्टींगचं काम सुरक्षितपणे व्हायला हवं. तसेच, मृतांच्या नातेवाईकांना भरीव मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App