———————————————————————————————————————————–
विशेष प्रतिनिधी
ठाणे : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची विहंग गार्डन इमारत अनधिकृत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
MLA Sarnaik’s glory revealed
प्रताप सरनाईक यांनी गरीब नागरिकांची फसवणूक केली असून याबाबत येत्या शुक्रवारी वर्तक नगर स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. बुधवारी भाजप कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन कथित घोटाळ्याची पोलखोल केली.
ठाण्यातील रेमंड कंपनीसमोर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी 13 मजल्याचे दोन टॉवर बांधले आहेत. कागदपत्रांची पूर्तता न करताच सर्व फ्लॅटची विक्री त्यांनी केली, असा आरोप सोमय्या यांनी केला.
2008 साली ठाणे मनपाने हे बांधकाम अनधिकृत ठरवले आणि कारवाईचे आदेश दिले परंतु आजतागायत त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात असल्याचे सोमय्या म्हणाले. प्रताप सरनाईक यांनी सामान्य नागरिकांची फसवणूक केली असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील सोमय्या यांनी केली.
त्याच अनुशंगाने येत्या शुक्रवारी सोमय्या ठाण्यातील वर्तक नगर पोलिस स्टेशनला सरनाईक विरोधात फ़ौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार आहेत. प्रताप सरनाईक यांच्या सारख्या गुन्हेगारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संरक्षण देत आहेत का?
ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना उद्धव ठाकरे यांना हे प्रकरण माहीत नाही का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. दरम्यान या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी व्हावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App