विशेष प्रतिनिधी
सांगली: माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच शिखर.या एव्हरेस्टवर तिरंगा फडकावण्याची कामगिरी एका मराठी पोलीस अधिकाऱ्याने केली आहे. सांगलीचे आणि सध्या नवी मुंबईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरुव यांनी रविवारी सकाळी ८ हजार ८४८ मीटर उंचीवर तिरंगा फडकावला. एव्हरेस्ट पहिल्याच प्रयत्नात सर करणारे ते पहिले मराठी पोलीस अधिकारी ठरले आहेत.MISSION EVEREST 2021 ‘RESPECT WOMEN’: Salute to the son of India! Hoisted the tricolor on Everest; Of Sangli Sambhaji Gurav became the first Marathi police officer
तिसऱ्या प्रयत्नात एव्हरेस्टला गवसणी
संभाजी गुरव ६ एप्रिल रोजी एव्हरेस्ट मोहिमेसाठी मुंबईहून निघाले. अनेक आव्हानांचा सामना करत त्यांनी एव्हरेस्टची चढाई सुरुच ठेवली. अखेर त्यांना तिसऱ्या प्रयत्नात माऊण्ट एव्हरेस्ट शिखर सर करण्यात यश आले.
संभाजी गुरव यांनी एव्हरेस्ट सर करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून तयारी केली होती. सहा एप्रिल रोजी ते मुंबईतून रवाना झाले. नेपाळमधील पायोनियर अॅडव्हेंचर्स गिर्यारोहक कंपनीकडून गुरव यांनी सहा जणांच्या पथकासह एव्हरेस्टवर १८ मे रोजी चढाई सुरू केली. किलीमांजरी शिखर सर केल्यानंतर गुरव यांच्या पथकाने प्रत्यक्षात एव्हरेस्टवर चढाई सुरू केली. त्यानंतर २१ मे रोजी त्यांनी अंतिम चढाईसाठी सुरुवात केली. एव्हरेस्टवर पोहोचण्यासाठी हवामान चांगले असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते. बर्फवृष्टी, व्हाइटआउट म्हणजे बर्फाचे धुके अशा अनेक अडचणींवर मात करून गुरव यांनी अखेर एव्हरेस्ट पादाक्रांत केले.
या मोहिमे दरम्यान त्याच्या पथकासोबत असलेला शेर्पा आजारी पडला होता. एव्हरेस्ट जवळ असून सर करता येणार नाही असे वाटत होते. पण अखेर अनुभवी शेर्पामुळे चढाई शक्य झाले. गुरव गेल्या १५ वर्षापासून पोलीस दलात कार्यरत आहेत. याआधी सांगलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा आणि औरंगाबाद येथील पोलीस कर्मचारी रफिक शेक यांनी एव्हरेस्ट सर केले होते. पण शर्मा हे पंजाबी अधिकारी होते तर शेख हे पोलीस कर्मचारी होते. त्यामुळे एव्हरेस्ट सर करणारे ते पहिले मराठी पोलिस अधिकारी ठरले आहेत. एव्हरेस्ट सर केल्याची बातमी गुरव यांचे मुळ गाव असलेल्या पडवळीवाडी येथे कळाल्यानंतर गावात आनंद साजरा करण्यात आला. वडील नारायण यांनी मुलाच्या कामगिरीचा अभिमान झाल्याचे सांगितले.
१९ मे- कॅम्प २ ते कॅम्प ३ २० मे- कॅम्प ३ ते कॅम्प ४ २१ मे- कॅम्प ४ ते एव्हरेस्ट समिट २३ मे- सकाळी अंतिम चढाई यशस्वी
संभाजी गुरव यांनी एव्हरेस्टवर चढाई करून देशाची मान उंचावली असली तरी याआधी देखील त्यांनी अनेक पराक्रम केले आहेत. गुवर यांनी गडचिरोलीत असताना केलेल्या कामगिरीसाठी त्यांना २०१४मध्ये राष्ट्रपती पदक, २०१५ मध्ये विशेष सेवा पदक, २०१८ मध्ये अंतरिक सेवा पदक आणि महासंचालकांचे विशेष पदक मिळाले आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील तिसरे अधिकारी
याआधी महाराष्ट्र पोलीस दलातील सांगलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा आणि औरंगाबादमधील पोलीस कर्मचारी रफीक शेख यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. पण एव्हरेस्ट सर करणारे संभाजी गुरव पहिले मराठी पोलिस अधिकारी ठरले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App