MILKHA SINGH ! मिल्खा सिंग यांच्या पत्नीचं कोरोनामुळे निधन


चंदीगढमध्ये खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली:भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांची पत्नी आणि भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर चंदीगढ येथे उपचार सुरु होते. अखेरीस वयाच्या ८५ व्या वर्षी निर्मल यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.MILKHA SINGH! Milkha Singh’s wife dies of corona

गेल्याच महिन्यात निर्मल यांना कोरोनाची लागण झाली होती. चंदीगढमधील एका खासगी रुग्णालयात ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. एक आठवड्यापूर्वी निर्मल यांची तब्येत बिघडल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली होती. निर्मल यांच्या शरीरातील ऑक्सिजनच्या पातळीत चढ-उतार होत होते. महत्वाची गोष्ट म्हणजे याच हॉस्पिटलमध्ये मिल्खा सिंग यांच्यावर उपचार होत असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

रविवारी ४ वाजता निर्मल यांनी अखेरचा श्वास घेतला, आपल्या पत्नीच्या अंत्यसंस्काराला मिल्खा सिंग यांना तब्येतीमुळे हजर राहता आलं नाही. दरम्यान या खडतर काळात आपल्याला पाठींबा देणाऱ्या सर्वांचे मिल्खा सिंग यांच्या परिवाराने आभार मानले आहेत. १९३८ साली निर्मल यांचा पाकिस्तानमधील शेखपुरा भागात जन्म झाला. निर्मल यांनी पंजाबच्या महिला व्हॉलीबॉल संघाचं नेतृत्व केलं होतं. १९५५ मध्ये श्रीलंकेत स्पर्धेसाठी गेल्या असताना त्यांची मिल्खा सिंग यांच्याशी भेट झाली. १९६२ मध्ये निर्मल आणि मिल्खा सिंग विवाहबंधनात अडकले.

मिल्खा सिंग आणि निर्मल यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. निर्मल यांचा मुलगा जीव मिल्खा सिंग हा गोल्फर असून निर्मल यांची मुलगी मोना ही डॉक्टर आहे.

MILKHA SINGH! Milkha Singh’s wife dies of corona

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात