MHADA Exam Date: म्हाडा भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

पेपर फुटीचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर 12 डिसेंबर 2021 रोजी रद्द करण्यात आलेली म्हाडाची भरती परीक्षा लवकरच घेण्यात येणार आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई: म्हाडामध्ये विविध पदांच्या भरतीसाठी परीक्षा (MHADA Exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पेपर फुटीचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर 12 डिसेंबर 2021 रोजी रद्द करण्यात आलेली म्हाडाची भरती परीक्षा लवकरच घेण्यात येणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर झाले आहे. त्यानुसार 29, 30 आणि 31 जानेवारी तसेच 1 ते 3 फेब्रुवारी रोजी परीक्षा होणार आहे. MHADA Exam Date: Big news for students preparing for MHADA recruitment! Exam schedule announced

म्हाडामधील 144 पदांसाठी 565 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या परीक्षेचे डिसेंबरमध्ये आयोजन करण्यात आले होते तेव्हा दोन लाखांपेक्षा जास्त अर्ज आले होते.

मात्र परीक्षेला काही तास शिल्लक असताना राज्य सरकारला परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय़ घ्यावा लागला होता. म्हाडा परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

आता या परीक्षेचे आयोजन 29 जानेवारी ते 3 फेब्रुवारी करण्यात आले आहे. ऑनलाइन पद्धतीने आणि ‘टीसीएस’च्या माध्यमातून म्हाडाची भरती परीक्षा होणार आहे.

MHADA Exam Date: Big news for students preparing for MHADA recruitment! Exam schedule announced

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात