राजसभेपूर्वी अभ्यास : इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे, सदानंद मोरे यांची भेट आणि चर्चा!!


प्रतिनिधी

पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आजच्या पुण्याच्या सभेच्या आधी होमवर्क पूर्ण केले आहे. राज ठाकरे यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे आणि संत साहित्याचे अभ्यासक संशोधक डॉ. सदानंद मोरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन चर्चा केली. Meeting and discussion with history researcher Gajanan Mehendale, Sadanand More

गजानन भास्कर मेहेंदळे हे थोर शिवचरित्रकार आहेत. त्यांच्याशी राज ठाकरे यांनी शिवचरित्र, महाराष्ट्र आणि हिंदुस्थानच्या इतिहासाविषयी चर्चा केली, तसेच डॉक्टर मोरे यांच्याकडून त्यांनी संत साहित्याचे विविध संदर्भ जाणून घेतले. आज सकाळी 10.00 वाजता राज ठाकरे यांची पुण्यातल्या गणेश कला क्रिडा केंद्रावर सभा आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीगाठी महत्त्वाच्या आहेत.

 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा पोवाडा यांच्यावर संभाजी ब्रिगेड तसेच अन्य काही इतिहासकार तुटून पडले होते. या पार्श्वभूमीवर
राज ठाकरे यांनी इतिहासा संदर्भात विशिष्ट भूमिकेतून राष्ट्रवादी कॉंग्रेस, संभाजी ब्रिगेड वगैरे पक्ष आणि संघटनांवर जोरदार शरसंधान साधले आहे. पार्श्‍वभूमीवर देखील इतिहास संशोधकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याला विशेष महत्त्व आहे. आज राज ठाकरे पुण्यातल्या सभेत नेमके काय होणार आयुध्या दौऱ्याबाबत तसेच त्यांच्यावर झालेल्या टीकेबाबत काय उत्तरे देणार??, याची प्रचंड उत्सुकता महाराष्ट्रात लागली आहे.

सभेच्या बंदोबस्तासाठी गणेश कला क्रीडा केंद्राभोवती पोलिसांचा प्रचंड फौजफाटा जमला आहे.

Meeting and discussion with history researcher Gajanan Mehendale, Sadanand More

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात