जमीन पुनर्प्राप्ती हा जगातील एक मोठा व्यवसाय झाला आहे. असंख्य देश समुद्राकडून जमीन परत घेत आहेत. चीनमधील जवळजवळ प्रत्येक किनारपट्टीच्या प्रांतात मुख्य भूमीपासून माती टाकण्याचे प्रकल्प सुरू आहेत.Marine life is on the rise all over the world
सिंगापूर, हॉंगकॉंगचा पसारा समुद्रात पसरला आहे. दुबईतील जगप्रसिद्ध पाम जुमिराह द्वीपसमूह ते अंदाजे 110 दशलक्ष घनमीटर समुद्रातील वाळूवाळूपासून बनविले आहे. मात्र संशोधकांना आता अशा प्रकारे समृद्र गिळंकृत करणे धोकादायक असल्याचे म्हटले आहे.
त्यांच्या मते अशा प्रकारे समुद्रात भराव टाकून समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाच्या खाली झालेले परिणाम सहजासहजी दिसत नसल्यामुळे सर्व आलबेल आहे असे वाटते. पण यामुळे समुद्री सजीव आणि त्यांच्या रहवासाचा नाश होतो, मत्स्यपाल नास पोषण करणारे आणि लाटांच्या तीव्र परिणामापासून किनारपट्टीचे संरक्षण करणारे कोरल रीफ नष्ट होतात.
मीठागर आणि खारफुटीसारख्या पर्यावरणीय यंत्रणेचा विनाश करतात. कृत्रिम पाम जुमिराह द्वीपसमूहामुळे दुबई पाम बेटांच्या आसपासच्या वातावरणावर महत्त्वपूर्ण परिणाम झाला आहे, परिणामी परिसराचे वन्यजीव, किनारपट्टीवरील धूप, किनार्यावरील गाळ वाहतुकीची आणि लाटाच्या पद्धतींमध्ये बदल दिसून आला आहे. बांधकामामुळे निर्माण झालेल्या गाळामुळे स्थानिक समुद्री जीव जखमी झाले आहेत तसेच किनाऱ्यावरील गाळाच्या वाहतुकीतील बदलांमुळे युएई किना-यावर बदल झाले आहेत याशिवाय धूप नमुन्यांमध्ये बदल झाला आहे.
बेटांच्या बांधकामासाठी वाळूचे ड्रेजिंग व पुन्हा फेरबदल करण्याच्या परिणामी, दुबईतील पर्शियन गल्फचे सामान्यतः स्फटिकासारखे पाणी गढूळ दिसत असून त्यामुळे सूर्यप्रकाशाची किरणे पाण्यात पोहचत नसल्याने सागरातील अन्न साखळीला धोका संभवत आहे. अशा मानव निर्मित बेटामुळे दुबईच्या सागरी वातावरणामधील महत्त्वपूर्ण बदल भविष्यकाळात तेथील समुद्रावरील विपरीत परिणाम समोर येतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App