
वृत्तसंस्था
नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान मोठे आहे, गती असलेले ते साहित्यिक होते, त्यांचे नाव साहित्यनगरीला देऊ नये म्हणून कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले, असे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.Marathi Sahitya Sammelanala Savarkar’s name is not
ते म्हणाले, अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा! केवळ स्वातंत्र्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगांनी परिपूर्ण कवि, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार, इतिहासकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न देण्याचा हट्ट कशासाठी? नाशिक ही स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा. अ.भा. मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविलेले. असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव! या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच. पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करीत नाही का?
असो,आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे. मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. यांना मी अभिवादन करतो. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. पण जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे? सावरकर यांचे योगदान मोठे आहे, गती असलेले ते साहित्यिक होते, त्यांचे नाव देऊ नये म्हणून कुसुमाग्रज यांचे नाव दिले.
शिवसेना खासदारांचा निर्लज्जपणा
दोन दिवसांपूर्वी संसदेत खासदारांचे निलंबन झाले तेव्हा माफ़ी मागावी, असा विषय आला.तेव्हा माफी मागायला आम्ही काय सावरकर आहोत का ?असे शिवसेनेचे सदस्य सांगतात. हा निर्लज्जपणा आहे. यातून शिवसेना सावरकरांची वारसदार नसल्याचे स्पष्ट होते, अशी टीका भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
– मराठी सारस्वताना सावरकरांच्या नावाचे वावडे
– आयोजकांकडून सावरकरांच्या नावाला विरोध
– माजी संमेलनाध्यक्षांचा संमेलनातच अपमान
– सावरकरांऐवजी कुसुमाग्रज यांचे नाव दिले
– कुसुमाग्रज यांचे नाव दिले त्याचे स्वागतच
Marathi Sahitya Sammelanala Savarkar’s name is not
Array