वृत्तसंस्था
लंडन: कोरोनाच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रिटनने अॅण्टीव्हायरल गोळीला सशर्त मंजुरी दिली आहे. अशी मंजुरी देणारा ब्रिटन हा पहिलाच देश ठरला आहे. ‘मोल्नुपिराविर’ असे या औषधाचे नाव आहे. मात्र, ही गोळी कधी उपलब्ध होईल, याबाबत स्पष्ट माहिती नाही. Manufacture of pills for the treatment of corona; Approval of antiviral pill in UK
वय १८ आणि त्यावरील वयाच्या बाधितांच्या उपचारासाठी या गोळीचा वापर होणार आहे.
कोविडची सौम्य लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींना ही गोळी दोनदा घ्यावी लागणार आहे. ही अॅण्टी व्हायरल गोळी कोरोनाच्या लक्षणांना कमी करत प्रकृतीत सुधारणा करण्यास मदतशीर ठरते. रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यासाठी आणि गरीब देशांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी ही गोळी फायदेशीर ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
औषध निर्माता कंपनी ‘मर्क’ने ही कोरोनावरील गोळी विकसित केली आहे. ऑक्टोबर महिन्यात ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ‘मोल्नुपिराविर’च्या ४, ८०,०००डोस मिळाले. या औषधाच्या माध्यमातून थंडीच्या दिवसात हजारो लोकांना उपचार मिळण्याची शक्यता आहे. ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी म्हटले की, आमच्या देशासाठी हा ऐतिहासिक निर्णय आहे. आम्ही कोरोनावरील औषधाला मंजुरी दिली. त्यामुळे आता घरीच उपचार घेता येणे शक्य होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App