नाशिक : MVA – Manoj jarange मनोज जरांगे हे मराठा + मुस्लिम + दलित कॉम्बिनेशन राबवून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असतील, तर लोकसभा निवडणुकीत त्यांच्या आधारावर यश मिळवणारी महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत कोणत्या फॉर्म्युल्यावर लढणार??, हा सवाल तयार झाला आहे.MVA – Manoj jarange
पवारांचा परफॉर्मन्स
लोकसभा निवडणुकीमध्ये “संविधान वाचवा” हा वरवरचा नॅरेटिव्ह चालवताना महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी हिंदू मधल्या मतांमध्ये फूट पाडून जातीय गणिताच्या आधारावर विशिष्ट यश मिळवले. मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा राजकीय लाभ महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना विशेषतः शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला झाला, हे आकडेवारीनिशी सिद्ध झाले. शरद पवारांच्या पक्षाचा राजकीय परफॉर्मन्स कधीही 80 % यशाचा नव्हता, तो 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दिसून आला. कारण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर हिंदूंमधल्या मतांचे ध्रुवीकरण झाले आणि मराठा मते पवारांच्या पक्षाकडे वळली होती.
व्होट जिहादचे बळ
त्याच वेळी व्होट जिहादच्या आधारे ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस जिंकले. भिवंडी आणि मालेगाव त्याची ठळक उदाहरणे ठरली. त्याचबरोबर मुंबईतले 4 मतदारसंघ, विदर्भातले काही मतदारसंघ यातून व्होट जिहाद मुळे काँग्रेसला “आधार” मिळाला. लोकसभा निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, त्यावेळेस “जरांगे फॅक्टर” जरी चालला होता, तरी तो स्वतंत्रपणे न चालता तो महाविकास आघाडीला लाभदायक ठरला होता. कारण जरांगे फॅक्टरचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे उभेच नव्हते.
आता मात्र मनोज जरांगे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही शक्तींना टाळून स्वतंत्रपणे आपल्या पाठिंबावर आधारित उमेदवार उभे करणार आहेत. महाराष्ट्रात कुठल्याही एका जातीवर निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे आम्ही मराठा + मुस्लिम आणि दलित समीकरण जुळवत आहोत. ते समीकरण जुळले की, आम्ही 30 ऑक्टोबर नंतर आमचे प्रत्येक मतदारसंघात 1 असे उमेदवार जाहीर करू. त्यांनाच मराठा + मुस्लिम आणि दलितांनी मतदान करावे, असे आवाहन करू आणि महायुतीचे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावाखालचे सरकार पाडू, अशी घोषणाच जरांगे यांनी केली आहे.
मविआचा व्होटर बेस घटणार
वरवर पाहता ही घोषणा महायुतीच्या सरकारला सुरुंग लावणारी वाटत असली, तरी प्रत्यक्षात महाविकास आघाडीचा “व्होटर बेस” काढून घेण्याचा हा प्रकार आहे. कारण हिंदूंच्या मतांच्या फुटीचा लाभ लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना झाला, तो विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जरांगे काढून घ्यायच्या बेतात आहेत. मराठा + मुस्लिम आणि दलित हे समीकरण जुळवणे म्हणजेच हिंदू मतांमध्ये फूट पाडणे ही राजकीय चाल जरांगे स्वतःच्याच उमेदवारांसाठी खेळणार आहेत. मग अशावेळी महाविकास आघाडीला हिंदूंच्या मतांमधल्या फुटीचा फायदा कसा काय होऊ शकेल?? त्यांना मूळात मतांचा खडखडाटच जाणवेल. कारण पवारांची मराठा व्होट बँक आणि काँग्रेसची मुस्लिम + दलित व्होट बँक जर जरांगे यांच्या भोवती एकजूट करणार असेल, तर तोट्यात कोण जाईल??, हे सांगायला फार मोठ्या ज्योतिषाची गरज नाही.
पण मास्टर माईंड ते घडू देतील का??
पण ते काहीही असले आणि जरांगेंनी जरी उघडपणे मराठा + मुस्लिम आणि दलित समीकरण जुळवायची भाषा केली असली, तरी प्रत्यक्षात जरांगेंचे “मास्टर माईंड” तसेच्या तसे घडू देतील, ही शक्यता फार दुरापास्त आहे. किंबहुना जरांगेंच्या मनातली मराठा + मुस्लिम आणि दलित वोट बँक खरंच एकत्र झाली, तर जरांगे स्वतःचे उमेदवारच एकतर जाहीरच करणार नाहीत, किंवा जाहीर केले, तरी फार मर्यादित संख्येच्या जागांवर जाहीर करतील, ही शक्यता दाट आहे… अन्यथा मास्टर माईंडने उभे केलेले सगळेच राजकीय मुसळ केरात जाण्याचा धोका आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App