पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून देशातील जनतेला संबोधित केलं. यावेळी कोरोना व्हायरसबाबत बोलतान त्यांनी बऱ्याच गोष्टींवर भाष्य केलं.’जनता कर्फ्यू’बाबत सूचक वक्तव्य.‘Mann ki Baat’
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशावर मोठं संकट आलं आहे. कोरोना व्हायरस हा देशातील लोकांच्या संयम व दु:ख सहन करण्याची परीक्षा घेतो आहे. या कोरोना व्हायरसमुळे अनेकांनी अकाली आपले प्रियजन गमावले आहेत. पण आता ही वेळ नव्याने लढा देण्याची आहे. आपण एकजूट होऊन लढण्याचे आणि अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. त्यासही मोदी यांनी रुग्णवाहिका चालकांना एंजल्स असे म्हण्टले आहे. ‘Mann ki Baat’- Fight Together!PM Modi says biggest priority is to defeat Covid-19
Tune in to #MannKiBaat April 2021. https://t.co/ti5rqBhiWH — Narendra Modi (@narendramodi) April 25, 2021
Tune in to #MannKiBaat April 2021. https://t.co/ti5rqBhiWH
— Narendra Modi (@narendramodi) April 25, 2021
मुंबई आणि श्रीनगरच्या डॉक्टरांशी संवाद-
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मुंबईतील डॉ. शशांक यांच्याशी चर्चा केली. डॉ. शशांक म्हणाले की, लोक कोरोनावर उशिरा उपचार सुरू करतात. फोनवर ज्या गोष्टी फॉरवर्ड होतात त्यावर विश्वास ठेवतात. डॉ. शशांक म्हणाले की, भारतात उत्तम उपचारांचे प्रोटोकॉल अस्तित्वात आहेत आणि लोक बरे होत आहेत. कोरोनाच्या म्युटेंटने घाबरून जाण्याची गरज नाही. या लाटेत जरी वेगाने पसरत असला तरीही अनेक रुग्ण यातून बरे होत आहेत. यावेळी मोदींनी श्रीनगरचे डॉक्टर नवीद यांच्याशीही संवाद साधला. तेव्हा डॉ. नवीद यांनी कोरोनाबद्दल अनेक महत्वाची माहिती दिली.
केवळ तज्ज्ञांचेच ऐका –
पंतप्रधान मोदींनी स्पष्टपणे सांगितलं की, कोरोना संदर्भात केवळ तज्ज्ञांचेच ऐका. डॉक्टरांच्या सल्ल्याचे अनुसरण करा आणि आवश्यक त्या उपायांचा अवलंब करा. लसीचे महत्त्व सर्वांना माहिती आहे. त्यामुळे लस संबंधित अफवांकडे दुर्लक्ष करा. सर्व पात्र लोक लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करुन घ्या.
रायपुरच्या नर्स सोबत संवाद –
पीएम मोदी यांनी रायपूरमधील एका रुग्णालयातील नर्स भावना ध्रुव यांच्याशी संवाद साधला. यावेळी कोरोना ड्युटी करताना आपले नेमके काय अनुभव होते हे जाणून घेतलं. त्यावेळी नर्स धुव्र म्हणाल्या की, सुरुवातीला माझे कुटुंबीय घाबरले होते. पण मी जेव्हा कोव्हिडच्या रूग्णांना भेटले तेव्हा ती लोकं अधिक घाबरले असल्याचं दिसून आलं होतं. पुढे काय करायचे हे त्यांना समजलं नव्हतं. पण आम्ही रुग्णालयात एक चांगलं वातावरण निर्माण केलं.
फ्रंटलाइन वर्कर्सचं कौतुक-रुग्णवाहिका चालकाशी संवाद-
पंतप्रधान मोदींनी फ्रंटलाइन वर्कर्सचे कौतुक केले. ते म्हणाले की लॅब तंत्रज्ञ आणि रुग्णवाहिका चालक मोठ्या जोखमीसह काम करत आहेत. यावेळी पीएम मोदी यांनी प्रेम वर्मा नावाच्या रुग्णवाहिका चालकाशी देखील संवाद साधला. त्याने त्याला त्याचा वैयक्तिक अनुभव विचारला आणि त्याचे कौतुक देखील केले.
याचवेळी पंतप्रधान असंही म्हणाले की, ‘गेल्या वर्षी मार्च महिन्यात देशातील जनतेने प्रथमच ‘जनता कर्फ्यू’ हा शब्द ऐकला होता. ‘जनता कर्फ्यू’ हा संपूर्ण जगासाठी आश्चर्यकारक गोष्ट होती. हे शिस्तीचे अभूतपूर्व उदाहरण होते. पुढील येणाऱ्या पिढ्या नक्कीच या एका गोष्टीबद्दल अभिमान बाळगतील.’ असंही मोदी यावेळी म्हणाले.
संक्रमण कोणत्याही परिस्थितीत खेड्यांपर्यंत पोहोचू देऊ नये-
‘जेव्हा आम्ही एक वर्षापूर्वी पंचायती राज दिनासाठी भेटलो होतो तेव्हा संपूर्ण देश कोरोनाशी मुकाबला करत होता. तेव्हा मी आपणा सर्वांना आवाहन केलं होतं की, आपण कोरोनाला आपल्या गावात येण्यापासून रोखलं पाहिजे. यासाठी आपण आपली भूमिका योग्यपणे पार पाडली पाहिजे. त्यावेळी तुम्ही सर्वानी मोठ्या कौशल्याने कोरोनाला फक्त खेड्यांपर्यंत पोहोचण्यापासून रोखले नाही, तर गावागावात जनजागृती करण्यातही मोठी भूमिका बजावली. या वेळेस देखील आपल्यासमोर असे आव्हान आहे की, हे संक्रमण कोणत्याही परिस्थितीत खेड्यांपर्यंत पोहोचू देऊ नये. हे थांबविणे आवश्यक आहे.’ असं मोदी यावेळी म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App