केवळ नाव कमावणे, पैसा, प्रसिद्धी मिळवणे म्हणजे यश नव्हे. जेव्हा आपण आपल्या कामावर प्रेम करतो तेव्हाच ख-या अर्थाने आपल्याला सफलता मिळते. अशा वेळी लोक काय म्हणतात याबाबत विचार करून वेळ व्यर्थ घालवू नये, उलट जे काम आपल्याला आवडते, जे काम केल्यानंतर आपल्या अंतर्मनाला आनंद मिळतो ते काम आपण केले पाहिजे. जर तुम्ही तुमच्या कामाने आनंदी नसाल तर तुम्हाला यशस्वी म्हटले जाणारच नाही.Make the right decision on your own
आयुष्यात नेमका कोणता मार्ग निवडावा असा संभ्रम पडला, तर तुमच्या आतला आवाज ऐका. आतून आलेला आवाजच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतो. बरेचदा आपल्याच निर्णयावर आपल्याला विश्वास ठेवावासा वाटत नाही असेही होते. कोणत्याही गोष्टीचा योग्य निर्णय नसतोच मुळी, तर आपण आपल्या कामानेच आपल्या निर्णयाला योग्य बनवत असतो. आयुष्यात एक टप्पा असा ही येतो ज्या टप्प्यावर तुम्ही चुका करता. परंतु त्या महत्त्वाच्या ठरत नाहीत.
आयुष्यात प्रत्येकजण पडतो, धक्के खातो. इतकच नाही तर ब-याचवेळा विपरित परिस्थितीतूनही प्रत्येकाला जावे लागते. परंतु अशा स्थितीत सुद्धा तुमचे धैर्य आणि संयम तुम्हाला लवचिक बनवतात, परिस्थितीशी जुळवून घेण्याचे शिकवतात.. म्हणजेच तुम्ही पडून पुन्हा उठून उभे राहता…आणि पुढे जाऊ लागता.
घर आणि शाळेसारख्या सुरक्षित वातावरणात आपण आपल्या जीवनातले कितीतरी मोठे धडे शिकतो. म्हणून जेव्हा आपण वास्तवात मोठे होतो. आणि बाहेरच्या जगात बाहेर पडतो त्यावेळी आपण जे काही घर आणि शाळेच्या वातावरणापासून शिकलेलो असतो तेच सर्वकाही आपल्या सोबत असते. तिथेच ख-या अर्थाने आपल्याला आयुष्यात पडून पुन्हा उभे राहण्य़ाची प्रेरणा मिळते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App