तेजस्वीला मुख्यमंत्री करा; आम्ही तुम्हाला पंतप्रधान बनवू..’ आरजेडीची नितीशकुमारांना ओसाड गावच्या पाटीलकीची ऑफर


विशेष प्रतिनिधी

पाटणा : मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपमध्ये फार काही अलबेल नसल्याच्या या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाने (RJD) पुन्हा एकदा बिहार मध्ये सत्ता पालट होईल का याची चाचपणी सुरू केली आहे. म्हणून तर तेजस्वी यादवला मुख्यमंत्री बनवा, आम्ही तुम्हाला 2024 मधील लोकसभेत पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित करू, अशी ऑफर राष्ट्रीय जनता दलाने दिली आहे Make Tejaswi CM; We will make you the Prime Minister ‘RJD’s offer to Nitish Kumar

अरुणाचल प्रदेशमध्ये जदयूचे सात पैकी सहा आमदार भाजपामध्ये गेल्यामुळे, काहीशी नाराज झालेल्या जदयूला विरोधी पक्ष असलेल्या राजदकडून एक खास ऑफर देण्यात आली आहे. राजदचे नेते आणि माजी बिहार विधानसभा स्पीकर उदय नारायण चौधरी यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, जर नितीश कुमार भाजपाप्रणीत एनडीए सोडत असतील आणि तेजस्वी यादव यांना बिहारचा मुख्यमंत्री बनवत असतील, तर विरोधी पक्ष त्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न करेल.

विशेष म्हणजे, “यंदा मला मुख्यमंत्री बनण्याची जराही इच्छा नव्हती. मात्र माझ्यावर हे पद स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यामुळे मी दबावामध्ये हे पद स्वीकारल्याचा दावा केलेला आहे.… हवे असेल तर भाजप स्वतःचाही मुख्यमंत्री बनवू शकतो, ” असे विधान नितीश कुमार यांनी नुकतेच केले आहे. त्यावरून त्यांची नाराजी जाणवत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Make Tejaswi CM; We will make you the Prime Minister ‘RJD’s offer to Nitish Kumar

नुकत्याच झालेल्या विधानसभेत नितीश कुमारांना जेमतेम 40 चा आकडा ओलांडता आला, पण भाजपने मात्र 74 जागा जिंकून दणदणीत यश मिळविले आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे मुख्यमंत्री नितीशकुमार असले तरीही सरकारवर भाजपचे वर्चस्व असल्याचे दिसते आहे. त्यातच नितीशकुमारांची अतिशय विश्वासू असलेले सुशीलकुमार मोदी यांना भाजपने बिहारमधून काढून दिल्लीत राज्यसभेवर पाठविल्याने नितीश कुमार यांच्या बरोबरील भाजपचा ‘संवाद सेतू’ राहिलेला नाही.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात