लाईफ स्किल्स : स्वतःमध्ये योग्य वेळी सकारात्मक बदल घडवून आणा!


आपल्या सगळ्यांना महत्त्व हवं असतं. माणसाला मी कुणीतरी विशेष आहे असं वाटून घ्यायला आवडतं. पण आपल्याला हा स्पेशल स्टेटस का मिळावा? तसं काहीतरी काम आपण करत असू, स्वतःच्या पलीकडं समाजासाठी काही करत असू किंवा आपला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात इतरांना उपयोग होत असला तरच. त्यासाठी खूप पैसे असायची, आपल्या नावाची चॅरिटी फाउंडेशन असायची गरज नाही. तुम्ही जिथं आहात तिथं, जसे आहात तसे आणि तुमच्याकडं आहे त्यानं इतरांच्या आयुष्याला हातभार लावता येतो.Make positive changes in yourself at the right time!

इच्छा मात्र हवी. ज्यांची इच्छा कमालीची असते, पण ती टिकत नाही किंवा स्वतःच्या आयुष्याच्या प्रवाहात या इच्छा मागे पडून जातात त्यांना आणखी जागरूकतेने जगण्याची गरज आहे. आपल्यासाठी जी गोष्ट सर्वसाधारण असते, ती कोणासाठी तरी खूप मोठी असू शकते. घरात फळे-ड्रायफ्रूट असणं, दारात गाडी, उंची कपडे, वाचायला पुस्तके, फ्रिज, पंखा, एसी, एक फोन फिरवून होणारी कामं…

अनेकांकडं यातलं काहीच नसतं. जगताना आपल्या आजूबाजूच्यांसाठी कशा पद्धतीची छोटी छोटी मदत होऊ शकते, याकडं पाहावं. आपल्या गरजेपुरतं आपण जगत राहिलो, तर आपण स्वार्थी व संकुचित ठरू.तुमच्यापैकी काहींना वाटेल की मी माझ्या कष्टाचं जगतोय ना, मग मला हवं ते मी का करू नये? मला सांगा शाळा-कॉलेजमध्ये तुमच्या खिशात पैसे नव्हते तेव्हा तुम्हाला किती जणांची मदत मिळाली? कोणीतरी लिफ्ट दिली, कोणीतरी नोट्स दिल्या, विषय समजावून देण्यात मदत मिळाली.

घरकाम करणाऱ्या मावशी, वॉचमन काका, ड्रायव्हर काका हे त्यांच्या कामापलीकडं जाऊन एक्स्ट्रा काम करतात, कारण आपण त्यांच्याकडून फेवर घेत असतो. मग आपण मोठे होतो, सक्षम होतो तेव्हा आपण कोणाच्या तरी गरजेला उपयोगी ठरलं पाहिजे, नाहीतर स्वार्थीपणे स्वतःसाठी जगत राहू. इतरांचं आयुष्य सुलभ व्हावं असा विचार करावा.

Make positive changes in yourself at the right time!

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण