भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यामुळे पश्चिम बंगालमधील जनतेत प्रचंड संताप आहे. त्यामुळे आता तृणमूल कॉंग्रेसचे नेते बरळू लागले आहे. खासदार महुआ मोईत्रा यांनी चक्क नड्डांवरील हा हल्ला बनावट असल्याचा दावा केला आहे.
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यामुळे पश्चिम बंगालमधील जनतेत प्रचंड संताप आहे. त्यामुळे आता तृणमूल कॉंग्रेसचे नेते बरळू लागले आहे. खासदार महुआ मोईत्रा यांनी चक्क नड्डांवरील हा हल्ला बनावट असल्याचा दावा केला आहे. Mahua Moitra saying the attack on JP Nadda was fake
राज्यात दाखल होणारे नेते आपापली उच्च दर्जाची सुरक्षा यंत्रणा सोबत घेऊन येतात, तरीही भाजप नेत्यांवर हल्ला कसा होऊ शकतो, असाही प्रश्न मोईत्रा यांनी उपस्थित केलाय. भाजप नेते पश्चिम बंगालमध्ये दररोज ब्रिंग युअर ओन सिक्युरिट सोबत दाखल होतात. राज्यात दौऱ्यावर येणारा भाजपचा कुणीही ऐरा-गैरा नेता आपल्यासोबत येताना सीआरपीएफ, सीआयएसएफ आणि केंद्रीय दलाच्या जवानांना घेऊन येतो. लज्जास्पद, ‘बनावट’ हल्ल्यांपासून ते तुमची सुरक्षा करू शकले नाहीत’ असे ट्विट महुआ मोईत्रा यांनी केलंय.
विशेष म्हणजे नड्डा यांच्या ताफ्यावरील हल्लाप्रकरणी पश्चिम बंगाल पोलिसांनी सात जणांना अटक केली असून, ३ एफआयआर नोंदले आहेत. पोलिसांनी दगडफेकी प्रकरणी देखील अज्ञात लोकांविरोधात दोन एफआयआर नोंदवले आहेत. याशिवाय अन्य एक एफआयआर भाजपा नेता राकेश सिंह यांच्याविरोधातही नोंदवला गेला आहे. ज्यांच्यावर जमावाला भडकवण्याचा आरोप आहे.
पश्चिम बंगाल पोलिसांच्या मते, जेपी नड्डा यांच्या वाहन ताफ्याला झेड सुरक्षेशिवाय बंगाल पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा प्रदान केली होती. नड्डा यांचा ताफा जाणार त्या मार्गावर आणि कार्यक्रमस्थळी चार अतिरिक्त पोलीस अधीक्षक, आठ पोलीस उपअधीक्षक, ८ पोलीस निरीक्षक, ३० पोलीस अधिकारी, ४० आरएएफ, १४५ शिपाई, ३५० सीव्हीचा बंदोबस्त होता.
जे. पी. नड्डा जेव्हा डायमंड हार्बरकडे जात होते. तेव्हा त्यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक झाली व हल्ला झाला. यामध्ये जेपी नड्डा सुरक्षित राहिले पण भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांच्यासह अन्य नेते जखमी झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App