विशेष प्रतिनिधी
मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे या पार्श्वभूमीवर आधी जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांमधले निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. मात्र महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांपैकी 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल थ्रीचे नियम लागू असतील. तर बाकीच्या तीन जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करायचे की नाही याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे घेतला जाईल असं सांगण्यात आलं आहे. हे 14 जिल्हे वगळता इतर 22 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारने ब्रेक द चेनच्या अंतर्गत घेतला आहे. Maharashtra Unlock :
22 जिल्ह्यांमध्ये काय आहे ब्रेक द चेनची नवी नियमावली?
अत्यावशक गरजेची असलेली आणि नसलेली दुकानं तसंच शॉपिंग मॉल हे सोमवार ते शुक्रवार हे पाच दिवस रात्री आठ वाजेपर्यंत सुरू असतील. शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत दुकानं आणि शॉपिंग मॉल सुरू ठेवण्यास मुभा. रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं आणि मॉल बंद राहणार.
सर्व सार्वजनिक उद्यानं, खेळाची मैदानं या ठिकाणी व्यायाम, सायकलिंग, वॉकिंग करण्यास मुभा
सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यास मुभा, यामध्ये एकाच शिफ्टला गर्दी न करता दोन शिफ्टमध्ये विभागणी करून बोलवण्यात यावं
वर्क फ्रॉम होमवर भर दिला तरीही चालणार आहे हेदेखील स्पष्ट करण्यात आलं आहे
शेतीविषयक सगळी कामं, सिव्हिल वर्क, इंडिस्ट्रिय अॅक्टिव्हिटी, माल वाहतूक पूर्ण क्षमतेने करण्यास मुभा
योगा सेंटर, जिम, हेअर कटिंग सलून, स्पा 50 टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवारी रात्री 8 पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा, शनिवारीप दुपारी 3 पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा. रविवारी ही सगळी दुकानं बंद राहणार
सिनेमा थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहं पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार
सगळी धार्मिक स्थळं पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार
सगळी रेस्तराँ 50 टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा. कोव्हिड प्रोटोकॉल पाळणं सक्तीचं. पार्सल सर्व्हिस आत्ता सुरू आहे तशी सुरू राहणार
सगळ्या जिल्ह्यांमध्ये रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत निर्बंध असणार आहेत
वाढदिवस, राजकीय सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार, रॅली, मोर्चे या सगळ्यांना मर्यादित स्वरूपात लोकांची उपस्थिती आवश्यक कोव्हिड प्रोटोकॉलचे सगळे नियम पाळणं आवश्यक
मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग हे सगळं पाळणं आवश्यक आहे.
राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल 3 चे निर्बंध
महाराष्ट्रातील 11 जिल्हे असे आहेत या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. संक्रमणाचा दर जास्त आणि कोरोना रुग्ण अधिक आढळत असल्यानं त्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. सक्रीय कोरोना रुग्ण अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे. या 11 जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने लेव्हल 3 चे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App