रिपब्लिकन न्यूज नेटवर्कचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर सूडबुध्दीने कारवाईसाठी पुरावे मिळावेत यासाठी चॅनलच्या उपाध्यक्षाला पोलीसांनी पट्याने मारहाण केली होती, असे उघडकीस आले आहे. या प्रकरणी न्यायालयात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई : रिपब्लिकन न्यूज नेटवर्कचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर सूडबुध्दीने कारवाईसाठी पुरावे मिळावेत यासाठी चॅनलच्या उपाध्यक्षाला पोलीसांनी पट्याने मारहाण केली होती, असे उघडकीस आले आहे. या प्रकरणी न्यायालयात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. Maharashtra police Republican TV latest news
रिपब्लिकन न्यूज नेटवर्कचे उपायक्ष घनश्याम सिंह यांना मुंबई पोलीसांनी अटक केली होती. त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती. यावेळी पोलीसांनी त्यांचा अनन्वित छळ केला. त्यांना गिरणीच्या पट्याने जबर मारहाण केली.
रिपब्लिकन टीव्हीच्या वृत्तानुसार, सिंह यांनी टीआरपी प्रकरणात खोटी साक्ष देऊन अर्णब गोस्वामी यांचे नाव घ्यावे यासाठी त्यांना धमक्या देण्यात आल्या. त्यांचा वारंवार छळ करण्यात आलो. त्यांना पिठाच्या गिरणीत वापरल्या जाणाऱ्या जाडजूड पट्याने मारहाण करण्यात आली. या वेळी सिंह वेदनेने कळवळत होते. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांचे मन द्रवले नाही.
रिपब्लिकनच्या चौकशीच्या नावाखाली मुंबई पोलीसांचे वर्तन चुकीचे, प्रकाश जावडेकर यांची टीका
पोलीसांनी एका माणसाला घनश्याम सिंह यांच्याकडे आणले. त्याला ते ओळखतही नव्हते. तरीही पोलीस म्हणाले की तू असे ऐकणार नाही. आता सांग याला पैसे दिले होते की नाही. यावरही बोलले नाही तर आमच्याकडे इतरही मार्ग आहेत अशा शब्दांत पोलीसांनी घनश्याम सिंह यांना धमकी दिली. कोठडीतील मारहाणीत ते जखमी झाले होते. त्यांच्यावर हातावर अनेक जखमा झाल्या होत्या.
न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात घनश्याम सिंह यांनी पोलीस कोठडीत झालेला छळ सांगितला आहे. त्यांना थर्ड डिग्री लावण्यासाठी पोलीसांनी भयानक प्रकार केले, असे त्यांनी म्हटले आहे. घनश्याम सिंह यांना २६ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर ६ डिसेंबर रोजी जामीन मिळाला. रिपब्लिकन टीव्ही कशा पध्दतीने टीआरपीमध्ये हेराफेरी करते हे विचारत त्यांना अनेक वेळा मारहाण करण्यात आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App