Maharashtra lockdown Update : महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन;नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती;राजेश टोपे म्हणाले लॉकडाऊन हा राष्ट्रवादीचा आग्रह


  • उद्या रात्री 8 वाजल्या पासून महाराष्ट्रात लागणार संपूर्ण लॉकडाऊन.

विशेष प्रतिनिधी

मुंबईः राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागणार आहे.राज्य मंत्रिमंडळाची बैठक आताच संपली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे सांगितले. राज्यातील कोरोनाचे आकडे कमी करण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक आहेत.ही चेन ब्रेक करण्यासाठी कठोर निर्बंध हवेत. ऑक्सिजन प्लाँट उभारून हवेतील ऑक्सिजन कामी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री उद्या निर्णय जाहीर करतील, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.याानंतर राजेश टोपे याांनी देखील सविस्तर माहिती देत महाराष्ट्राला लॉकडाउन करावा असा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह असल्याचे स्पष्ट केले आहे. maharashtra lockdown Signs of strict lockdown in the maharashtra, Chief Minister uddhav thackeray announce soon

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाची प्रदीर्घ बैठक पार पडली. कडक निर्बंध ऐवजी लॉकडाऊन करावा याबाबत अनेक मंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. आज राज्यमंत्र्यांना सुद्धा कॅबिनेट बैठकीत बोलवण्यात आलं होतं.

लॉकडाऊन बाबत चर्चा झाली आहे. सर्व लशी देण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी केंद्राकडे मागणी केली आहे. ऑक्सिजन, लस पुरवठा दिला जाणार आहे. काही तासात लॉकडाऊनचा निर्णय होणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल लवकरच घोषणा करणार आहेत अशी माहिती टोपे यांनी दिली.

संसर्ग वाढतच असल्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागत आहे, 21 एप्रिलपासून रात्री 8 वाजेपासून राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे.

 

maharashtra lockdown Signs of strict lockdown in the maharashtra, Chief Minister uddhav thackeray announce soon

 

 

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात