ठाकरे – पवार सरकारमध्ये परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर


  • आरबीआयच्या आकडेवारीत क्रमवारी समोर आल्याची फडणवीसांची माहिती

वृत्तसंस्था

नागपूर : ठाकरे – पवार सरकारमध्ये परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे ही बाब निश्चितच चिंतेची आहे, असे मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. Maharashtra down to no. Three in FDI says RBI

फडणवीस म्हणाले, “आमची सत्ता असताना महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर होता. मात्र मागील वर्षभरात हा क्रमांक थेट तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक होते आहे याचा आम्हाला आनंद आहे. Maharashtra down to no. Three in FDI says RBI

मुळात यातले अनेक प्रकल्पांचे एमओयू हे आमच्या काळातच झाले आहेत. मात्र आता पुन्हा ते होत आहेत हरकत नाही महाराष्ट्रासाठी जे चांगलं होते आहे त्याचा आम्हाला आनंदच आहे.”

सगळ्यात मोठी चिंतेची बाब ही मागील चार वर्षात आपण पहिल्या क्रमांकाचे FDI चे राज्य केले होते. देशामध्ये येणाऱ्या परकीय गुंतवणुकीत सगळ्यात जास्त गुंतवणूक चारही वर्षे महाराष्ट्रात येत होती.

Maharashtra down to no. Three in FDI says RBI

आता आरबीआयने जे आकडेवारी घोषित केली त्यात गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे आणि त्याच्या मागे महाराष्ट्र आहे. ही बाब निश्चितच चिंतेची आहे असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात