विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रविवार 8 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता सोशल मीडियावरून राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. याबाबतची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. Maharashtra CM LIVE: Chief Minister Uddhav Thackeray will address the people of the state today
राज्यात सध्या कोरोनाचा (Corona)) संसर्ग कमी झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील जवळजवळ 25 जिल्ह्यात लॉकडाऊनसंबंधी (Lockdown) जे कठोर नियम होते ते आधीच शिथिल करण्यात आले आहेत. मात्र असं असलं तरीही अद्याप संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाही. राज्यात जवळजवळ 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल 3 निर्बंध आहेत. अशावेळी या सगळ्याबाबत मुख्यमंत्री आजच्या संबोधनात काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे.
राज्यातील 11 जिल्ह्यात अद्यापही निर्बंध कायम आहेत. कारण येथील अनेक भागात कोरोना रुग्णांची संख्या ही चिंता वाढवणारी आहे. ज्यामुळे येथील भागातील दुकानं फार कमी वेळ सुरु ठेवता येत आहे. त्यामुळे येथील व्यापारी वर्गाची मागणी आहे की, लवकरात लवकर येथील दुकानं सुरु ठेवण्याची वेळ वाढविण्यात यावी.
व्यापारी वर्गाला दिलासा देण्याचा काही मुख्यमंत्री निर्णय घेणार का? याकडेही अनेकांचं लक्ष असणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App