इस्रायलमध्ये महागठबंधन ! नेतन्याहू युगाचा अंत ; ६ खासदार असलेले नवे पंतप्रधान ‘नेफ्टाली बेनेट’ !


इस्रायलमध्ये सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची इस्रायलवरील सत्ता संपुष्टात आनली आहे .


आता इस्रायलचे नवे पंतप्रधान 6 खासदार असलेले नेफ्टाली बेनेट हे असणार आहेत.Mahagathbandhan in Israel ! The end of the Netanyahu era; New Prime Minister Nefatali Bennett with 6 MPs!


वृत्तसंस्था

जेरुसलेम : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची इस्राईलवरील सत्ता संपुष्टात आलीय. सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येत महागठबंधन करत नेतन्याहू यांना सत्तेतून बाजूला केले आहे .सुमारे दोन आठवड्यांपूर्वी, जेव्हा इस्रायल सर्वात वाईट सांप्रदायिक तणावांशी झुंज देत होता, गाझा येथून रॉकेट्स चालविण्यात येत होते तेव्हा कुणीही ही कल्पना केली नसेल की  डाव्या, उजव्या आणि मध्यवर्ती अशा विरोधी विचारसरणीचे  पक्ष अरब पक्षाबरोबर एकत्र येतील. हे सर्व पक्ष पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना सत्तेतून काढून टाकण्यासाठी अशा राष्ट्रीय एकतेचे सरकार स्थापन करण्यास सहमत आहेत.Mahagathbandhan in Israel ! The end of the Netanyahu era; New Prime Minister Nefatali Bennett with 6 MPs!

आता इस्रायलचे नवे पंतप्रधान 6 खासदार असलेले नेफ्टाली बेनेट होणार आहेत. इस्रायलच्या 8 विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापनेवर एकमत बनवलं आहे. त्यांच्याकडून नेफ्टाली बेनेट यांना पंतप्रधान पदासाठी पुढे केलं जाणार आहे .

इस्रायलमध्ये मार्च 2021 मध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकीत नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षाला बहुमत मिळू शकलं नाही. त्यानंतर त्यांनी अल्पमताचं सरकार स्थापन केलं. निवडणुकीत नेतन्याहू यांचा पक्षा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असतानाही इस्राईलचे राष्ट्रपती रुवेन रिवलिन यांनी नेतन्याहू यांच्या पक्षाला सरकार स्थापनेचं निमंत्रण देत 2 जूनपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं. मात्र, ते अनेक प्रयत्न करुनही बहुमत सिद्ध करु शकले नाही.

नेतन्याहू यांच्या पक्षाने बहुमत जमवण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले, मात्र त्यांना बहुमताचा आकडा मिळवता आला नाही. दुसरीकडे इस्राईलचे विरोधी पक्षनेते येर लेपिड यांनी इस्राईलच्या विरोधी पक्षांमध्ये सरकार स्थापनेबाबत एकमत झाल्याचं जाहीर करत सरकार स्थापन करणार असल्याची घोषणा केलीय. या नव्या आघाडीत 8 पक्षांचा समावेश आहे.

सत्ता वाटपाचा फॉर्म्युला

विरोधी पक्षांनी इस्रायलमध्ये सत्तास्थापनेची घोषणा करतानाच आपल्या सत्तेच्या वाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर केलाय. यानुसार सुरुवातील यामिन पक्षाचे प्रमुख नेफ्टाली बेनेट इस्रायलचे पंतप्रधान असणार आहेत. त्यानंतर दोन वर्षे येश एटिड पक्षाचे नेता येर लेपिड स्वतः पंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारतील

कोण आहेत नेफ्ताली बेनेट?

नेफ्ताली बेनेट एक कोट्याधीश उद्योजक आहेत. तंत्रज्ञानातील व्यवसायाने त्यांनी अमाप संपत्ती जमवलीय. त्यांचे आई-वडील अमेरिकी आहे. ते अमेरिकेतून इस्राईलमध्ये येऊन स्थायिक झाले होते. तंत्रज्ञानातील व्यापारानंतर आता 49 वर्षीय बेनेट राजकारणात आलेत. नेफ्ताली बेनेट उजव्या विचारसरणीचे राजकीय नेते म्हणून परिचित आहेत.

त्यांच्या भूमिकांवरुन राजकीय विश्लेषक त्यांना ‘अति-राष्ट्रवादी’ म्हणतात. बेनेटने फेब्रुवारीमध्ये म्हटलं होतं की मी नेतन्याहूपेक्षा उजवा आहे. मात्र, राजकीय फायद्यासाठी द्वेष किंवा धार्मिक धृवीकरणाचा उपयोग करत नाही.”

Mahagathbandhan in Israel ! The end of the Netanyahu era; New Prime Minister Nefatali Bennett with 6 MPs!

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात