एखाद्या रडणाऱ्या बाळाला आईच्या हलक्याश्या गुणगुणण्याने छानशी झोप लागते. दिवसभर ऑफिसमधून घरी परतताना गाडीतला रफींचा आवाज डोकं शांत करतो. ट्रेनच्या गर्दीतली धक्काबुक्की कानातल्या एफएमच्या कॉडमुळे लक्षातही येत नाही. हे सगळं का होतं? कसं होतं? ही जादू आहे ती संगीतामध्ये. एखादी चिंता, थकवा, काळजी दूर करण्यासाठी संगीत ही एक अगदी परिणामकारक उपचारपद्धती आहे. संगीत ऐकल्यामुळे उजव्या आणि डाव्या मेंदूमधील सुसूत्रीकरण करण्यासाठी उपयोग होतो. याचा उपयोग शरीरातील थकवा, चिंता दूर होण्यासाठी होतो. अशा कारणांसाठी म्युजिक थेरपी सध्या फार प्रचलित आहे. अशी आख्यायिका आहे, की तानसेनने दरबारामध्ये राजा अकबरासाठी रागदरबारी या रागाची निर्मिती केली होती. संगीतामधल्या या रागामुळे राजा अकबराच्या मनावरचा ताण, थकवा दूर करण्यासाठी मदत होत असे. भारतीय संगीतशास्त्रामध्ये विविध राग आणि त्यांचा शरीरावर होणारा परिणाम याची सांगड घालण्यात आली आहे. Life Skills: When you feel overwhelmed or unwell, listen to the song, listen to good music and get rid of anxiety
निराशा, ताण, थकवा यांचा शीण घालवायचा असेल तर एखादं तुमच्या आवडीचं गाणं नक्की ऐका, यामुळे तुम्हाला नक्की रिफ्रेश वाटेल. आपल्याकडे अनेक राग असे आहेत. ज्याचा फायदा तुमच्या अनेक व्याधी कमी करण्यासाठी होवू शकतो. ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांनी रागभूपाळी, रागतोडी ऐकावा. राग चंद्रकंस हा हृद्यविकारावर तर राग तिलककामोद दुर्गा, कलावती ताणतणाव कमी करण्यासाठी उपयुक्त मानला जातो. राग बिहार आणि राग बहार शांत झोपेसाठी उपयुक्त आहे. संगीताचे फायदे जाणून घ्यायचे असतील तर हे करून पहा. शक्यतो सकाळी उठल्यावर टीव्हीवर, रेडिओवर, मोबाईलवर तुमच्या एखादं आवडीचं गाणं लावून ठेवा. साधारणत: दिवसाच्या सुरूवातीला जी धून कानावर पडते ती दिवसभर डोक्यात राहते. त्यामुळे एखाद्या आवडीच्या गाण्याने दिवसाची सुरूवात करा. जेव्हा अतिराग किंवा अस्वस्थ वाटत असेल तर गाणं जरूर ऐका. त्याने आपला मूड रिफ्रेश होतो. आजारी माणसाच्या खोलीमध्ये गाणी ऐकता येईल अशी सोय करून ठेवा. त्यामुळे आजारी माणसाला आजारपणामुळे निर्माण होणाऱ्या वाईट विचारांवर सहज मात करता येईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App