वृत्तसंस्था
नवी दिल्ली: भारताचे महान ॲथलिट मिल्खा सिंग (Milkha Singh Passed away) यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. मिल्खा सिंग यांनी वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 20 मे 2021 रोजी मिल्खा सिंग यांना कोरोना संसर्ग झाला होता. चंदीगड येथील पीजीआई रुग्णालयात मिल्खासिंग यांनी शुक्रवारी रात्री (18 जून) अखेरचा श्वास घेतला. काही दिवसापूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर यांचं निधन झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिल्खासिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. Legendary Indian Sprinter Flying Sikh Milkha Singh Passed Away due to Corona at the age 91
1958 :: Milkha Singh Defeating Abdul Khaliq of Pakistan In 200 Meter Race to Win Gold Medal In Tokyo Asian Games . ( Photo – The Hindu Newspaper ) pic.twitter.com/LM0rgYlhcG — indianhistorypics (@IndiaHistorypic) June 18, 2021
1958 :: Milkha Singh Defeating Abdul Khaliq of Pakistan In 200 Meter Race to Win Gold Medal In Tokyo Asian Games .
( Photo – The Hindu Newspaper ) pic.twitter.com/LM0rgYlhcG
— indianhistorypics (@IndiaHistorypic) June 18, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मिल्खा सिंग यांना आदरांजली वाहिली आहे. मिल्खा सिंग यांच्या निधनामुळे आपण महान खेळाडूला मुकलो आहोत. त्यांनी देशाच्या असंख्य नागरिकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं होतं, असं नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्यासारखं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून निघून जाणं ते फार दुख:द आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये मिल्खा सिंह यांच्याशी गेल्या काही दिवसांपूर्वीच बोलणं झालं होतं. ती चर्चा अखेरची असेल असं वाटलं नव्हतं, असं देखील मोदी म्हणाले.
In the passing away of Shri Milkha Singh Ji, we have lost a colossal sportsperson, who captured the nation’s imagination and had a special place in the hearts of countless Indians. His inspiring personality endeared himself to millions. Anguished by his passing away. pic.twitter.com/h99RNbXI28 — Narendra Modi (@narendramodi) June 18, 2021
In the passing away of Shri Milkha Singh Ji, we have lost a colossal sportsperson, who captured the nation’s imagination and had a special place in the hearts of countless Indians. His inspiring personality endeared himself to millions. Anguished by his passing away. pic.twitter.com/h99RNbXI28
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2021
मिल्खासिंग यांच्या जीवनावर चित्रपट मिल्खा सिंह यांच्या जीवनावर ‘भाग मिल्खा भाग’ या नावाचा चित्रपट देखील बनवण्यात आला होता. मात्र,चित्रपटात मिल्खा सिंह यांच्या जीवनातील थोडासाच संघर्ष दाखवण्यात आला होता. फ्लाईंग सिख या नावाने देखील ते प्रसिद्ध होते. मिल्खा सिंह यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला होता. मिल्खा सिंह यांनी 1968 कॉमनवेल्थ गेम्समध्ये विजेतेपद मिळवलं होतं. 1960 च्या ऑलम्पिक स्पर्धेत ते चैौथ्या स्थानावर राहिले होते भाग घेतला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App