Kili Paul Honoured : टांझानियाचा इन्स्टा स्टार-बॉलिवूडचा जबरा फॅन-किली पॉल-भारताकडून सन्मान ! कोण आहे किली पॉल ? बहिणीसोबत थिरकतो …

गेल्या काही दिवसांपासून टांझानियाचा रहिवासी असलेला किली पॉल चर्चेत आहे. तो कधी लिपसिंक करताना तर कधी बॉलिवूड गाण्यांवर धमाकेदार डान्स करताना दिसतो. तो असे जबरदस्त व्हिडिओ बनवतो जे सोशल मीडियावर ट्रेंड करू लागतात. त्याच्या फॉलॉवर्स मध्ये मोठ्या संख्येने भारतीयांचा समावेश आहे.


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली :सध्या टांजानियाचा (tanzania) किली पॉल (kili paul) हा सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचे कारण असे आहे की, किली हा बॉलिवूडच्या प्रेमात पडलाय. तो कधी लिपसिंक करताना तर कधी बॉलिवूड गाण्यांवर धमाकेदार डान्स करताना दिसतो. तो असे जबरदस्त व्हिडिओ बनवतो जे सोशल मीडियावर ट्रेंड करू लागतात.Kili Paul Honored: India honors Tanzanian Insta star Kili Paul! Who is Kelly Paul?Stirring with sister on Bollywood songs …

https://www.instagram.com/reel/CX3uCAlJ2FC/?utm_source=ig_web_button_share_sheet

कीली पॉलने अलीकडेच बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिला लहानपणापासूनच बॉलिवूड चित्रपट आणि गाणी आवडतात. सुरुवातीला तो एकटाच व्हिडीओ बनवायचा, पण नंतर त्याने त्याची धाकटी बहीण निमा (निमा पॉल) हिचाही समावेश केला. तो म्हणाला, ‘मला बॉलीवूड चित्रपट आवडतात कारण मी भारतीय चित्रपट बघत मोठा झालो आहे. मी बऱ्याच दिवसांपासून बॉलीवूड गाणी ऐकत आहे. त्यामुळे माझी हिंदी गाण्यांची आवड वाढली. हिंदी गाणी ऐकल्यावर खूप छान वाटतं.

https://www.instagram.com/reel/CaAJwKIO7eD/?utm_source=ig_web_button_share_sheet

तो हिंदी गाण्यांवरील रिल्स तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करतो. त्याच्या रिल्सला नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळत आहे. टांजानियाचा सोशल मीडिया स्टार किली पॉलला टांजानियातील भारतीय दुतावासाने सन्मानित केले आहे. सोशल मीडियावर किली पॉलचे आता लाखो फॅन आहेत. एवढे फॅन तर एखाद्या बॉलीवूड कलाकाराला देखील नाही.

टांजानियाच्या भारतीय उच्चायुक्ताने बिनाया प्रधान यांनी सोमवारी ट्विटरवर पॉल सोबतचा एक फोटो शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. फोटोमध्ये बिनाया प्रधानला भारतीय दूतावासात पॉलला सन्मानित करताना दिसत आहे. प्रधान यांनी ट्विट केले आहे की, आज टंजानियाच्या भारतीय दूतावासात एक खास पाहुणा आला आहे. हिंदी गाण्यांवरील रिल्स तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करत लाखो भारतीयांचे मन जिंकले आहे.

पॉलने इन्स्टाग्रामवर भारतीय उच्चायुक्तांचे आभार म्हणाले आहे. त्याने लिहिले आहे की, भारतीय उच्चायुक्तांचे आभार मानले आहे. कल हो ना हो’ या चित्रपटाच्या टायटल साँगवर लिप्सींग करतानाच्या किलीच्या व्हिडीओला सध्या नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

अनेकांनी त्यांच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 93 हजारपेक्षा जास्त लाइक्स किलीच्या या व्हिडीओला मिळाले असून 9 लाख 31 हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. सध्या पॉलचे सोशल मीडियावर 22 लाख फॉलोअर्स आहे. अभिनेता आयुष्मान खुराना, गुल पनाग आणि ऋचा चड्डा सहित अनेक भारतीय कलाकार पॉलला सोशल मीडियावर फॉलो करत आहे.

किलीसोबतच त्याची बहिण निमा पॉल देखील सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत असते. या दोघांच्या हिंदी गाण्यांवरील व्हिडीओला नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळते. बिजली बिजली, टिप टिप बरसा पानी आणि कूसू कूसू या हिंदी गाण्यांवरील व्हिडीओ किलीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पॉलने इन्स्टाग्रामवर भारतीय उच्चायुक्तांचे आभार म्हणाले आहे. त्याने लिहिले आहे की, भारतीय उच्चायुक्तांचे आभार मानले आहे. कल हो ना हो’ या चित्रपटाच्या टायटल साँगवर लिप्सींग करतानाच्या किलीच्या व्हिडीओला सध्या नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. अनेकांनी त्यांच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 93 हजारपेक्षा जास्त लाइक्स किलीच्या या व्हिडीओला मिळाले असून 9 लाख 31 हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. सध्या पॉलचे सोशल मीडियावर 22 लाख फॉलोअर्स आहे. अभिनेता आयुष्मान खुराना, गुल पनाग आणि ऋचा चड्डा सहित अनेक भारतीय कलाकार पॉलला सोशल मीडियावर फॉलो करत आहे.

 

Kili Paul Honored: India honors Tanzanian Insta star Kili Paul! Who is Kelly Paul?
Stirring with sister on Bollywood songs …

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात