खलिस्थानवादी फुटीरतावादी संघटनेनेभारतीय लष्करातील शीख सैनिकांना भारताविरोधात बंड करण्यासाठी चिथावणी देण्याचा कट रचला होता,असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : वेगळ्या शीख राष्टासाठी खलिस्थानवादी अतिरेक्यांचे कारस्थान सुरूच आहे. अमेरिकेतील शीख फॉर जस्टिस या खलिस्थानवादी फुटीरतावादी संघटनेनेभारतीय लष्करातील शीख सैनिकांना भारताविरोधात बंड करण्यासाठी चिथावणी देण्याचा कट रचला होता,असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दाखल केलेल्या आरोपपत्रात हे म्हटलं आहे. Khalistanist ‘Sikhs for Justice’ conspiracy news
एसजेएफ नेता गुरपतवंत सिंग पन्नून, खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीप सिंग निज्जर आणि बब्बर खालसा इंटरनॅशनलचा प्रमुख परमजीत सिंग यांच्यासह सोळा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काश्मिरी युवकांना कट्टरपंथाकडे नेऊन तसंच काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याचे एसजेएफे उघडपणे समर्थन करतं, असं आरोपपत्रात म्हटलं आहे.
…म्हणे भिंद्रनवाला अतिरेकी नव्हता, पंजाबी अभिनेता दीप सिध्दूची मुक्ताफळे
गुरपतवंत सिंग पन्नू न्यूयॉर्कचा, निज्जर कॅनडाचा तर परमजीत यूकेचा रहिवाशी आहे. जुलै महिन्यात यूएपीए अंतर्गत या चौघांचा दहशतवाद्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यूएपीए अंतर्गत शीख फॉर जस्टिसवर बंदी असून ही संघटना खलिस्तानी दहशतवादी संघटनांचा चेहरा असून पाकिस्तानशी संबंधित आहे, असे एनआयएने म्हटले आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करुन, एसजेएफ स्वतंत्र खलिस्तानच्या उद्दिष्टासाठी शांतता-सौहार्द बिघडवणे, अस्थिरता वाढवण्याचे काम करते असे एनआयएमधील सूत्रांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App