विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतील आम आदमी पार्टी सरकारने दिवाळीत सहा कोटी रुपयांची उधळपट्टी केवळ तीस मिनिटात केल्याचे माहिती अधिकार अंतर्गत उघड झाले आहे. Kejriwal government’s expenditure 6 corores for laxmi poojan
पक्षातर्फे दिवाळीत लक्ष्मी पूजनाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचे थेट प्रक्षेपणही केले होते, असे सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी सांगितले. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नावर सहा कोटींचा खर्च झाल्याची माहिती त्यांना मिळाली. Kejriwal government’s expenditure 6 corores for laxmi poojan
दिल्ली सरकारचा पर्यटन आणि पर्यावरण विभागाने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी ट्विटद्वारे माहिती देताना त्यांनी सांगितले की, 14 नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजन आणि त्याचे थेट प्रक्षेपण या 30 मिनिटाच्या कार्यक्रमावर 6 कोटी खर्च केले होते. याचाच अर्थ प्रति मिनिट 20 लाख खर्च केले होते.
दिल्लीत प्रदूषण होते. दिवाळीत फाटाक्याचे प्रदूषण टाळण्याच्या उदात्त हेतूने हा कार्यक्रम आयोजित केला होता, असे सांगण्यात आले. त्या माध्यमातून लोकांनी घरातून कार्यक्रमाचा पाहावा, यासाठी थेट प्रक्षेपणही केले. परंतु, गोखले यांच्या ट्विटनंतर याबाबत सरकारकडून प्रतिक्रिया उमटलेली नाही.
दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम झाला. त्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मंत्रिमंडळातील सहकारी त्यांच्या पत्नी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
दरम्यान, साकेत गोखले यांचे ट्विट शेअर करताना काँग्रेसचे दिल्लीचे अध्यक्ष अनिल कुमार यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणतात, डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी वेतन नाही म्हणून आंदोलन करत असताना केजरीवाल हे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कार्यक्रमात दंग होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App