मेंदूचा शोध व बोध : आहार, व्यायामाने मेंदू ठेवा तल्लख

आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीरासोबत मानसिक आरोग्यदेखील सांभाळणं हे एक प्रकारचं आव्हान आहे. पण तुम्हाला आजच्या शर्यतीच्या युगात तग धरून टिकून राहण्यासाठी मानसिक आरोग्याला जास्तीत जास्त सांभाळणं गरजेचं आहे.Keep the brain brilliant with diet, exercise

थोडक्यात काय तर, आपण जे खातो त्यातील आवश्यक पौष्टिक घटकांमुळेच मेंदूला चालना मिळत असते. त्यानेच आपली वाढ होत असते. त्याशिवाय बदलत्या काळासोबत मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश आणि काही क्रियांचा समावेश करणे गरजेचे आहे.

जाणून घ्या कोणते पदार्थ आणि काय केल्यानं मेंदूला चालना मिळेल आणि बुद्धी तल्लख होईल. हे पदार्थ नियमितपणे आहारात असतील तर मानसिक आरोग्य सुरळीत राखण्यास मदत करतील. मेंदूसाठी अक्रोड आणि बदाम उपयुक्त ठरतात. अक्रोड किंवा बदामासारखा सुकामेवा नियमितपणे खावा. एक किंवा दोन अखंड अक्रोड खाल्ले तरी पुरेसं आहे. बदाम खाऊनही स्मरणशक्ती वाढते.

चार बदाम आदल्या रात्री दुधात भिजत घालावेत आणि ते दुधासह सकाळी अनशापोटी चावून खावेत. यामुळे फायदा होऊ शकतो. मांसाहारी असाल तर रेड मीटपेक्षा मासे खाणं कधीही चांगलं. मासे खाणं एकंदरीत मानसिक आरोग्यासाठी चांगलं आहे. स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. रावस, बांगडा या प्रकारच्या माश्यांमध्ये ओमेगा तीन फॅटी असीड भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे मेंदू तल्लख राहतो.

आठवड्यातून दोन वेळा हे मासे खाल्ल्याने अनेक मेंदूचे विकार दूर रहातात, शिवाय स्मरणशक्ती तीक्ष्ण रहाते. मेंदूचा व्यायामही महत्वाचा असतो. आता तुम्ही म्हणाल मेंदूचा व्यायाम कसा करायचा. मेंदूला सतत चालना देण्यासाठी वेगवेगळे खेळ खेळावेत. सुडोकू, कोडी, बुद्धिबळ अशा प्रकारचे बैठे खेळ खेळावेत. कॅल्क्युलेटरचा उपयोग करण्याऐवजी स्वतः आकडेमोड करावी. याशिवाय चित्रकला, विणकाम शिकावी किंवा एखादी नवी भाषा शिकावी. मेंदू तरुण राहावा, मेंदू तल्लख राहावा, विचार चपळ राहावेत यासाठी असे मेंदूचे व्यायाम करावेत.

Keep the brain brilliant with diet, exercise

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात