सध्या ऑनलाईन व कॅशलेस आर्थिक व्यवहारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र त्याचबरोबर त्यात फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. अशा वेळी हे व्यवहार करताना काही मुलभूत गोष्टी केल्या पाहिजेत. जेणेकरून फसवणूक टळून पैसा वाया जाण्याचा धोका कमी होईल. यासाठी काही सोपे उपाय योजले पाहिजेत.Keep passwords large and complex to avoid financial fraud
आपण आपले सर्व आर्थिक व्यवहार फक्त आपल्या किंवा आपल्या घरच्या सदस्यांच्या इंटरनेटवरून किंवा स्मार्टफोनवरून केले पाहिजेत. यामुळे आपली खासगी माहिती चोरीला जाण्याची शक्यनता कमी होते. शिवाय आपण आपल्या संगणकांमध्ये तसेच स्मार्टफोनमध्ये व्हायरसना प्रतिबंधित करणारे अँटिव्हायरस सॉफ्टवेअर वापरले पाहिजे; तसेच ते अद्ययावत ठेवले पाहिजे. यासाठी कदाचित एक-दोन हजार रुपये खर्च होतील.
पण त्यामुळे आपले हजारो-लाखो रुपयांचे नुकसान टळू शकेल. आपले पासवर्ड, तसेच पिन क्रमांक कधीच कोणाला सांगता कामा नये. तसेच ते कोठे लिहूनसुद्धा ठेवू नयेत. बरेचदा खूप पासवर्ड आणि पिन लक्षात ठेवणे जिकिरीचे होते. अशा वेळी पासवर्ड सेफसारखे इंटरनेटवरून फुकट डाऊनलोड करता येणारे अत्यंत उत्कृष्ट आणि सुरक्षित सॉफ्टवेअर जरूर वापरावे. यामुळे पासवर्ड आणि पिन लक्षात ठेवण्याची कटकट दूर होते आणि सर्व पासवर्ड आणि पिन अत्यंत सुरक्षित राहतात.
आपल्याला हवे तेव्हा आपल्या संगणकांमधून किंवा स्मार्टफोनमधून फक्त आपण ते मिळवू शकतो. आपले पासवर्ड मोठे आणि क्लि ष्टही हवेत. आपला कष्टाचा पैसा वाचविण्यासाठी व तो वाया जावू नये यासाठी या किमान गोष्टी प्रत्येकानेच करायला पहिजेत. कारण यातच प्रत्येकाचे हित सामावलेले आहे. आपल्याकडे सायबर गुन्हेगारांचे प्रमाण वाढत आहे. तसेच अशा प्रकारे कोणाकडून फसवणूक झाल्यानंतर बॅंकाकडून परत पैसे मिळवणे ही फार कठीण व वेळखाउ गोष्ट मानली जाते. त्यामुळे प्रत्येकानेच या गोष्टींची दखल घेणे गरजेचे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App