शेअर बाजारात सध्या सतत चढउतार पहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदाराला गुंतवणूक कोठे करायची हा प्रश्न सतावत असतो. खरे पाहिल्यास कोणत्याही काळात कोठे व कशी गुंतवणूक करावी याबाबत संभ्रम निर्माण होवू शकतो. मात्र या क्षेत्रातील जाणकारांच्या मते तुम्ही जर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करीत असाल तर ती सध्या तरी बंद करू नये. पालक म्हणून आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी तुम्ही अशी गुंतवणूक करणार असाल तर त्यासाठी आपल्या नावावर वेगळा पोर्टफोलिओ निर्माण करून त्यात एसआयपीच्या माध्यमातून नियमित गुंतवणूक करावी.Keep in mind the many benefits of a consistent investment
इक्विटी योजनांतून दीर्घकाळात चांगला परतावा मिळू शकतो. करसवलत घ्यायची असल्यास ईएलएसएसचा विचार करावा. सहज उपलब्ध आहे म्हणून त्याच्या निव्वळ मालमत्ता मूल्याचा फारसा विचार करू नये. आपल्याला पैशांची अंदाजे कधी गरज लागू शकेल त्याच्या दोन ते तीन वर्षे आधी योजनेतून मिळत असलेला परतावा पाहून, तो आपणास अपेक्षित किंवा असाधारण असेल तर एसआयपी खंडित न करता पूर्ण रक्कम काढून लिक्विड फंडात वळवावी.
याचा उपयोग आपल्या खऱ्याखुऱ्या गरजेनुसार करता येईल आणि बाजारातील अनिश्चतीचा त्यावर परिमाण होणार नाही. दहा वर्षांहून अधिक काळ सातत्याने गुंतवणूक करीत राहिल्यास चक्रवाढ व्याजाने किमान १५ टक्के परतावा मिळायला हरकत नाही. योजनेची निवड करण्यात काही अडचण वाटत असल्यास व्यावसायिक सल्लागाराची मदत घ्यावी. शेअर बाजार सध्या कमालीचा अस्थिर बनला आहे. त्यामुळे त्या वाटेला अपुऱ्या माहितीनुसार जाणे योग्य नव्हे.
शेअर बाजारात थोडे जागृत राहून आपल्या गुंतवणुकीवर उच्च परतावा मिळवणे शक्य असते. पण त्यासाठी तज्ञांची मदत जरूर घ्यावी. यासाठी डी मॅट खाते उघडून यातील गुंतवणूक नियमित गुंतवणूकीपासून वेगळी ठेवावी. कॉफी कॅन पोर्टफोलिओ हे एक गुंतवणूक तंत्र असून, त्याच्या मदतीने गेल्या दहा वर्षांत सर्वोत्तम परतावा देणाऱ्या आणि नियमितता राखणाऱ्या कंपन्या आपणास समजल्या तर आपल्या ऐपतीप्रमाणे यात गुंतवणूक करता येईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App