“काशीवाले विश्वनाथने हिंदू को फटकारा है!!, कहो गर्व से हम हिंदू है, हिंदुस्थान हमारा है!!” ही घोषणा तर 1992 च्या अयोध्या कारसेवेच्या वेळ दिली गेली आहे. ही घोषणा देत आमच्यासारखे “धर्मवेडे हिंदू” तेव्हा अयोध्येला पोहोचले होते…!! पण ही घोषणा आजच आठवायचे कारण काय…?? असं काय घडलंय… की घडणार आहे??… त्यामुळे ही घोषणा आजच अचानक आठवली!!??Kashiwale Vishwanath has rebuked the Hindus !!, say proudly we are Hindus, Hindustan is ours .
उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे उद्घाटन होणार आहे. पण तिथे कोणी कारसेवेला गेले नव्हते. ते काम हिंदुत्ववादी सरकार आल्यानंतर कारसेवेशी शिवाय घडले आहे. तिथे गेल्या 33 महिन्यांमध्ये जे काम सुरू होते, त्यावेळी देखील कोणीही घोषणा दिली दिल्याचे ऐकिवात नाही. पण मग आजच ही घोषणा आठवायचे नेमके कारण काय आहे…??
हे कारण काशी विश्वनाथ कॉरिडोरमध्ये नाही. हे कारण जयपूरमध्ये घडले आहे…!! काशी विश्वनाथचा त्याला नक्की संदर्भ आहे, पण तो ना कारसेवेचा आहे… ना कोणी हिंदुत्ववाद्याने दिलेल्या घोषणेचा आहे…!! तो संदर्भ थेट आहे, काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी दिलेल्या घोषणेचा…!! “होय, मी हिंदू आहे”, ही ती घोषणा आहे. ही घोषणा 1992 च्या कारसेवेच्या वेळी काशी विश्वनाथाच्या साक्षीने आणि नावाने दिली गेली आहे…!! ( हे राहुल गांधींना माहिती नसावे कारण त्यावेळी ते तिथे नव्हते.)
पण राहुल गांधी यांनी, “होय मी हिंदू आहे,” ही घोषणा करून एका झटक्यात हिंदुत्ववाद्यांना त्या घोषणेपासून “अलग” करून टाकले आहे आणि त्या घोषणेवर ते आपण स्वतः स्वार झालेले आहेत…!! याला म्हणतात काँग्रेसी राजकारण…!!
आता याला भारतीय राजकारणाचे हे 360 अंशांचे वळण नाही तर दुसरे काय म्हणायचे…?? जी काँग्रेस “हिंदू” हे नाव ऐकताच अंगावर पाल पडल्यासारखे दूर पळत होती, त्याच कॉंग्रेसच्या गांधी परिवारातील नेत्याने, “होय, मी हिंदु आहे”, हे जाहीर सभेत सांगणे याला दुसरे काय म्हणायचे…?? हा कशाचा परिणाम आहे?? खरंच काशीवाल्या विश्वनाथाने फटकार दिली आहे का?? आणि त्या फटक्याच्या वेदनेतून ही घोषणा बाहेर आली आहे का??
हिंदू आणि हिंदुत्ववादी हा भेद करण्याची वेळ का आली? आता हिंदूंचे नाव घेतल्याशिवाय आपले राजकारण पुढे रेटताच येणार नाही, याची खरंच जाणीव झाली आहे का?? धर्मनिरपेक्षतेचे ढोल बडवून – बडवून ते फुटले आहेत का??
महागाई विरोधातल्या सभेत महागाईवर कमी आणि हिंदुत्ववादावर जास्त का बोलावे लागले?? नुसते बोलावे लागले असे नाही तर हिंदूंची थेट नवी व्याख्या का करावी लागली?? हिंदुत्ववादी सत्तापिपासू आहेत. ते कोणालाही मारू शकतात हे आजच कळले का?? हिंदू समाज त्यापासून वेगळा आहे, याचा साक्षात्कार आजच का झाला?? हिंदुत्ववादी सत्तापिपासू होते, तर 1952 पासून 2014 पर्यंत ते सत्तेबाहेर ताटकळत का थांबले असते?? मधल्याच कोणत्या मार्गाने त्यांनी सत्ता काबीज का नाही केली…??
पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायची गरज नाही. हिंदूंना हिंदुत्ववाद्यांनी पासून वेगळे काढले की आपले काम झाले. हिंदूंचा वारसा सांगायला जानवेधारी दत्तात्रय गोत्री ब्राह्मण मोकळे झाले…!!
पण तरीही प्रश्न उरतोच… आजच हिंदुत्वाची, हिंदूंची आठवण होण्याचे कारण काय?? उद्यापासून महिनाभर काशी विश्वनाथाच्या धामामध्ये हिंदुत्ववादाचा शंख, भेरी, मृदंग, डमरू हे वाजणार आहेत म्हणून राजकीय भीतीपोटी स्वतः हिंदु असल्याचा साक्षात्कार झाला आहे का…?? कळायला मार्ग नाही. 10 जनपथमध्ये तेवढे कुणाची पोहोच नाही. पण आपण हिंदु असल्याचा साक्षात्कार आज झाला आहे खरे आहे. उद्या दुपारी 1:37 ते 1:57 मिनिटे या वीस मिनिटांच्या मतंग मुहूर्तावर काशी विश्वनाथ कॉरिडोरचे उद्घाटन होणार आहे. त्याचा मुहूर्त काशीच्या फार मोठ्या विद्वानांनी काढून दिला आहे.
पण त्याच्या आदल्याच दिवशी कोणा महान नेत्याला आपण हिंदु असल्याचा साक्षात्कार होईल आणि हिंदू समाजाला तो हिंदू असल्याची नवी व्याख्या मिळेल याचा मुहूर्त आणि भाकीत मात्र कोणत्याही शास्त्री पंडिताला करता आले नव्हते हे खरे…!! शेवटी शास्त्री पंडित हे काही झाले तरी मानवच!! त्यांना थोडीच काशीवाल्या विश्वनाथाची फटकार कळणार…!!??!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App