भाषेवरून वाद होतात. पण, लिपी कोणती वापरायची यावरून संघर्ष झालेली आसममधील बोडो ही भाषा आहे. चिनी – तिबेटी भाषेचे मिश्रण असलेली ही भाषा कोणती लिपी वापरायची यावरून वारंवार होरपळली होती. अखेर आसाम सरकारने बोडोला सह राज्यभाषेचा दर्जा देण्यास मान्यता देऊन न्याय दिला. या भाषेच्या संघर्षाची गाथा…
विशेष प्रतिनिधी
गोहत्ती : आसाममध्ये बोडो भाषेला सह राज्यभाषेचा दर्जा देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या संदर्भातील बैठक बुधवारी झाली.राज्यात आसामी, बोडो भाषा प्रामुख्याने बोलली जाते. काही भागात बोडो जनजातीचे प्राबल्य आहे. त्यामुळे बोडो भाषा जीवनाचा भाग बनावा आणि तिला शासकीय मान्यता मिळावी, यासाठी अनेक दशके संघर्ष सुरू होता. Justice for the Bodo language
आसामी भाषेचे वर्चस्व बोडोना अमान्य होते. तेथील संघर्षाची ठिणगी पडली. चिनी आणि तिबेटी यांचे मिश्रण असलेली ही भाषा आहे. 1913 पासून या प्रश्नी संघटना निर्माण झाली. 1965 मध्ये पाचवी ते दहावीपर्यंत शाळांमध्ये बोडोत शिक्षण देण्यास सुरुवात झाली. विद्यापीठात बोडो साहित्य व भाषेचे पदवी शिक्षणही दिले जाते.
Assam cabinet gives nod for introduction of bill to accord Bodo the status of associate official language of the state: CMO— Press Trust of India (@PTI_News) December 22, 2020
Assam cabinet gives nod for introduction of bill to accord Bodo the status of associate official language of the state: CMO
संघर्षाच कारणबोडो भाषेसाठी कोणती लिपी वापरायची यावरून संघर्ष झाला. डिओढाई हि लिपी नामशेष झाल्यानंतर लॅटिन लिपीचा 1843 ते 1904 पर्यंत वापर केला गेला. 1915 ते 1956 पर्यत आसामी, बंगाली लिपी वापरली गेली. बोडो साहित्य परिषदेने आसामी लिपी स्वीकारली. 1963 मध्ये बोडोत शालेय शिक्षण सुरु झाले.
पण 1960 मध्ये आसामी लिपीचा विरोध झाला आणि लॅटिन लिपीचा आग्रह सुरु झाला. 1970 मध्ये साहित्य सभेने आसामी ऐवजी लॅटिन लिपी योग्य ठरविली. परंतु सरकारने भारतीय लिपी स्वीकारावी, असा आग्रह धरला. 1974 मध्ये बोडो साहित्य सभेने लॅटिन लिपीतील पुस्तके काढून शाळांमध्ये लागू केली. पण सरकारने या शाळांचे अनुदान रद्द केल्याने परिस्थिती चघळली. त्यावेळी झालेल्या संघर्षात 15 जणांचा बळी गेला. केंद्राकडे हा प्रश्न राज्य सरकारने सोपविला. अखेर देवनागरी लिपी स्विकारण्याच 1957 मध्ये एकमुखी मान्य झाले.
Justice for the Bodo language
लिपीचा वाद सुरूचदेवनागरीत बोडो भाषा लिहिण्यात अडचणी आल्या. लेखक लॅटिन, आसामी, बंगाली भाषेतच लिहू लागले. 1982 मध्ये पुन्हा लॅटिनचा आग्रह झाला. बोडोलँड स्वायत्त परिषदेने अखेर बोडो प्रदेशातील शाळांत लॅटिन लिपीचा आग्रह धरला. अखेर आसाम सरकारने ही मागणी मान्य केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App