विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले नसते तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे भाजपात असते, असा गौप्यस्फोट भाजपा नेते नारायण राणे यांनी केला आहे. jayat patil news
जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना राणे म्हणाले की, आज महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील हे भाजपामध्ये असते. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची याबाबत बोलणीही झाली होती. जयंत पाटील स्वत:च भाजपमध्ये येण्यासाठी भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या संपर्कात होते.
पाटलांच्या इस्लामपुरात जाऊन हे सर्व मी उघड करणार आहे, असे राणे म्हणाले. त्यांच्याबाबत माझ्याकडे जी माहिती आहे ती मी तिथेच उघड करणार आहे. राज्यात पुढचे सरकार आमचेच असेल असे जयंत पाटील म्हणत आहेत. पण, पुढील सरकारमध्ये मी मंत्री असणार असे त्यांना म्हणायचे असेल, असेही राणे यांनी म्हटले आहे.
ट्वीटरद्वारे राणे यांना उत्तर देताना जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, नारायण राणे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये गणले जात नाहीत हे जाणून मला खेद वाटला. भाजपच्या कुठल्या वरीष्ठ नेत्यांशी मी कधी, कुठे चर्चा केली याचा तपशील मला कळला तर माझ्याही ज्ञानात भर पडेल. माझ्यापुरते सांगायचे झाले तर, माझी भाजपच्या कोणत्याही वरीष्ठ नेत्याशी भाजपमध्ये जाण्याबाबत चर्चा झालेली नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App