राजकारणी-लेखक सुधींद्र कुलकर्णी आणि गीतकार जावेद अख्तर यांची ममता बॅनर्जीसोबत दिल्लीत भेट .
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्लीः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बनर्जी तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत.राजकारणी-लेखक सुधींद्र कुलकर्णी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी आज ममता बॅनर्जी यांची दिल्ली येथे भेट घेतली. तर, काँग्रेस नेते आणि माजी खासदार कीर्ती आझाद यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत हरियाणा काँग्रेसचे माजी अध्यक्ष अशोक तंवर यांनीही तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.Javed Akhtar meets Mamata Banerjee! Congress leader Kirti Azad joins TMC
उत्तर प्रदेश, पंजाब, त्रिपुरा, उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्या दिल्ली दौऱ्यात अनेक राजकारण्यांशी भेट घेत आहेत.
Delhi: Politician-columnist Sudheendra Kulkarni and lyricist Javed Akhtar arrive at TMC general secretary Abhishek Banerjee's residence to meet West Bengal CM and TMC chief Mamata Banerjee. pic.twitter.com/9JCHdFHVdH — ANI (@ANI) November 23, 2021
Delhi: Politician-columnist Sudheendra Kulkarni and lyricist Javed Akhtar arrive at TMC general secretary Abhishek Banerjee's residence to meet West Bengal CM and TMC chief Mamata Banerjee. pic.twitter.com/9JCHdFHVdH
— ANI (@ANI) November 23, 2021
कीर्ती आझाद काँग्रेसपूर्वी भाजपमध्ये होते आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते संसदेत पोहोचले. मात्र पक्षविरोधी कारवायांमुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. नंतर, 2018 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
दरम्यान, गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लुईजिन्हो फलेरो यांनीही तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
जेडीयूचे माजी नेते आणि राज्यसभा खासदार पवन वर्मा यांनीही तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App