वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणानंतर आज जम्मू- काश्मीरवर सर्वपक्षीय बैठक होणार आहे. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती दिल्लीत पोहोचल्या आहेत .या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासह केंद्रशासित प्रदेशातही हाय स्पीड इंटरनेट सेवा बंद राहण्याची शक्यता आहे.JAMMU KASHMIR: All-party meeting with PM Modi on Jammu and Kashmir; Mehbooba Mufti arrives in Delhi; 48-hour high alert in Jammu and Kashmir
जम्मू – काश्मीरमध्ये कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पीडीपी जम्मू-काश्मीरमध्ये तयार झालेल्या पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लेरेश युतीचा एक भाग आहे. ज्याची मंगळवारी बैठक झाली आणि त्यानंतर पंतप्रधानांशी सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला.
५ ऑगस्ट, २०१९ ला केंद्र सरकारनं जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा हटवल्यानंतर पहिल्यांदाच अशी बैठक बोलावण्यात आली आहे. ज्यात पंतप्रधान काश्मीरच्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी बोलणार आहेत. केंद्र सरकारबरोबर झालेल्या या बैठकीत ८ राजकीय पक्षांच्या १४ नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App