विशेष प्रतिनिधी
जालना : कोरोनाच्या वाढत्या रूग्णांसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये म्युकोरमायकॉसिस हा बुरशीजन्य आजार समोर आला आहे .या आजाराची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या आजाराच्या जागृतीसाठी मोहिम हाती घेण्यात येणार असून म्युकोरमायकॉसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेद्वारे मोफत उपचार करण्यात येतील,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे .Jalna: Free treatment for patients with mucomycosis through Mahatma Phule Janaarogya Yojana; Information of Health Minister
जालना येथे माध्यम प्रतिनिधींनीशी संवाद साधताना आरोग्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. यासंदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले, ज्या कोरोना रुग्णांना मधुमेह आहे आणि त्यांचा मधुमेह नियंत्रित नाही त्यांच्यामध्ये म्युकोरमायकॉसिस या बुरशीजन्य आजाराचे लक्षण आढळून येत आहे.
नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका या आजारात आढळून येत असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
या आजारावर लवकर उपचार नाही केले तर श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरित परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे सांगतानाच या आजाराचे लवकर निदान होणे गरजेचं असल्याने त्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे.
या आजावरील औषध महागडे असून त्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या १००० रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील.
म्युकोरमायकॉसिस आजारावरील इंजेक्शन देखील चढ्या दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी असून त्याची किंमत निश्चित करून त्यावर नियंत्रण आणले जाईल. या आजारामुळे कोरोना रुग्णांनी घाबरून न जाता मधुमेह असणाऱ्यांनी तो नियंत्रीत ठेवावा. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून घेण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
काय आहे ‘म्युकोरमायकॉसिस’?
कोरोना उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या स्टेरॉइडमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
सामान्यतः श्वास घेताना युब्युक्युटस नावाचे जीवाणू नाकामध्ये जातात. परंतु रोगप्रतिकार शक्ती संतुलीत नसेल तर ‘म्युकोरमायकॉसिस’ या बुरशीची वाढ होते.
कोरोनानंतर व्यक्तीमधील रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते.
तसेच मधुमेह किंवा इतर सहव्याधी असलेल्या लोकांमध्ये या बुरशीच्या संसर्गाची शक्यता आहे.
म्युकोरमायकॉसिसची लक्षणे:
चेहऱ्यावर सूज येणे
गाल दुखणे
डोळे दुखणे, डोळ्यांना सूज येणे
डोके दुखणे, नाक दुखणे
रक्ताळ किंवा काळसर जखम
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App