जय देव जय देव जय मंगलमूर्ती तिरंगा फडकू दे लाहोर वरती…!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पठाणकोट येथील प्रचारसभेत काँग्रेस पक्षावर काँग्रेस सरकारांवर जोरदार हल्लाबोल करताना त्या पक्षाच्या आणि सरकारांच्या बोटचेपेपणा मुळे लाहोर वर भारताचा तिरंगा फडकला नाही, अशी खंत व्यक्त केली.Jai Dev Jai Dev Jai Mangalmurti Tiranga Phadku De Lahore Varti

पंतप्रधानांच्या भाषणात अकबराचा राजकीय भाग वगळला तरी लाहोर वर तिरंगा फडकवण्याची त्यांची भावना 1971 मध्ये कशी होती, या मागचा खरा इतिहास तपासला असता एक रंजक बाब समोर येते, ती म्हणजे खरोखर त्यावेळी हीच जनभावना प्रबळ होती. 1971 चे युद्ध सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रात तरी निदान या जनभावनेचने उत्कट रूप धारण केले होते.

स्वतंत्र बांगलादेश निर्मितीचे भारत-पाकिस्तान प्रत्यक्ष युद्ध 3 डिसेंबर 1971 16 डिसेंबर 1971 एवढे दिवस चालले. त्यावर्षीचा गणेशोत्सव अर्थातच युद्धापूर्वी म्हणजे 24 ऑगस्ट 1971 ते 4 सप्टेंबर 1971 या कालावधीत झाला होता.

या ऐतिहासिक गणेशोत्सवात “तिरंगा फडकू दे लाहोर वरती” या जनभावनेला वाट मिळाली होती आणि महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणच्या शेकडो गणेशोत्सव मंडळांमधून ही आरती वाजली होती, “जय देव जय देव जय मंगलमूर्ती तिरंगा फडकू दे लाहोर वरती”…!!

त्या वर्षी आणि त्या नंतरच्या वर्षी म्हणजे 1972 मध्ये अनेक गणेश मंडळांनी भारत-पाकिस्तान युद्धाचे आणि आपल्या शूर सैन्यदलाचा गौरव करणारे अनेक देखावे उभे केले होते. या देखाव्यांमध्ये सैनिकांबरोबरच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांच्या कटआऊटही समावेश होता. हे देखावे पाहण्यासाठी गावागावांमध्ये प्रचंड गर्दी झाली होती.

आपल्या भारतीय सैन्यासाठी अनेक गणेश मंडळांनी मदतीचे आवाहन केले होते. त्यामुळे पुणे, मुंबई, नाशिक कोल्हापूर नगर औरंगाबाद अमरावती नागपूर सह संपूर्ण महाराष्ट्रभर जनसमुदायाने भारतीय जवानांना सढळ हाताने विविध प्रकारची मदत केली होती. केवळ गणपतीच्या आरतीतच ही जनभावना प्रतिबिंबित झालेली दिसली असे नव्हे, तर मंडळाच्या विविध देखाव्यांमधूनही हीच जनभावना आढळून येत होती, अशा आठवणी अनेक ज्येष्ठ मंडळींनी सांगून ठेवल्या आहेत.

Jai Dev Jai Dev Jai Mangalmurti Tiranga Phadku De Lahore Varti

https://youtu.be/07U6kJXyFkE

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात