काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांपासून हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यात मोठा भेद असल्याचे वारंवार वक्तव्य केले आहे. किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे उद्घाटन केल्याच्या आदल्या दिवशीचा नेमका “राजकीय मुहूर्त” साधत राहुल गांधी यांनी हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यात भेद असल्याचे सांगून घेतले. त्यानंतर आजपर्यंत असा एकही दिवस गेलेला नाही की जेव्हा राहुल गांधींनी अथवा प्रियांका गांधींनी हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यात भेद असल्याचे सांगितले नाही अथवा ट्विट केले नाही…!!Intellectual food” of Hindu and pro-Hindu differences !!; Whose exactly ?? And to whom
पण नेमके याचे राजकीय रहस्य काय आहे…?? या राजकीय रहस्यामागे नेमके कोण आहे…??, याचा तपशीलवार खुलासा स्वतः राहुल गांधी कधीच करणार नाहीत, पण हिंदू आणि हिंदुत्ववादाचा “बौद्धिक खुराक” त्यांना नेमका कोणी दिला आहे?, हे ट्विटरवरची काही नावे धुंडाळली असता लक्षात येते.
गेल्या काही दिवसांपासून हिंदूंच्या धार्मिक स्थळांभोवती जो विकास केंद्रित होतो आहे त्याबद्दल काही “बौद्धिक आक्षेप” आणि खुसपटे काढण्याचे “कंत्राट” काही बुद्धिमंतांनी घेतल्याचे लक्षात येत आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर हिंदूंना पवित्र असलेली चारधामे महामार्गाने जोडण्याचा प्रकल्प केंद्रातल्या मोदी सरकारने आखला आहे. आता त्यावर थेट आक्षेप तर घेता येत नाही, पण मग पर्यावरणाचे मुद्दे काढून त्यावर आक्षेप घेण्याचे “विशेष बौद्धिक तंत्र” रामचंद्र गुहा, अरुंधती रॉय वगैरे बुद्धिमंतांनी “विशेष विकसित” केले आहे.
MLAs, Mayor; relatives of Commissioner, SDM, DIG, officials buy land in Ayodhya after SC cleared Ram temple https://t.co/75febwmnqW — Ramachandra Guha (@Ram_Guha) December 22, 2021
MLAs, Mayor; relatives of Commissioner, SDM, DIG, officials buy land in Ayodhya after SC cleared Ram temple https://t.co/75febwmnqW
— Ramachandra Guha (@Ram_Guha) December 22, 2021
त्यात अयोध्येमध्ये राम जन्मभूमि मंदिर बांधण्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर जमिनींच्या दरांमध्ये कशी वाढ झाली आहे?, त्या जमिनी नेमक्या वरिष्ठ सनदी अधिकारी आमदार खासदारांचे नातेवाईक कसे घेत आहेत याचे तपशीलवार वर्णन करणाऱ्या बातम्या प्रसिद्धीमाध्यमांनी दिल्या आहेत. त्या नेमक्या स्वरूपात ट्विट करण्याचे कामही रामचंद्र गुहा तसेच अन्य काही बुद्धिमंत करताना दिसत आहेत.
या बुद्धिमंतांचा हिंदू आणि हिंदुत्ववादी या भेदाचा “खुराक” घेऊन राहुल गांधी यांनी देखील तशा आशयाची ट्विट करायला सुरुवात केली आहे. (देशात कोणत्याही व्यक्तीला एकच टर्म पंतप्रधान राहता आले पाहिजे, हे अरुंधती रॉय यांचे वक्तव्य ही याच “बौद्धिक कॅटेगरीत” बसते…!!)
गेल्या काही दिवसांमध्ये राहुल गांधींच्या हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यातल्या भेदाची भाषणे ऐकली एक सूक्ष्म फरकही लक्षात येतो आहे, तो म्हणजे ते हिंदुत्ववाद्यांमध्ये नथुराम गोडसेचे नाव घेतात. पण आता मात्र ते सावरकरांचे नाव घेणे टाळताना दिसतात. सावरकरांवर ते “माफीवीर” असल्याचा आक्षेप घेऊन देशभरातून काँग्रेसला जे “बॅकफायर” सहन करावे लागले, त्यातून राहुल गांधी यांनी सुटका करून घेतल्याचे दिसते आहे.
पण देशातले हिंदुत्ववादी सरकार आता घालवता येणार नाही, तर निदान हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यात भेद निर्माण करून आपले राजकीय हेतू साध्य करता येतात का?, याचा ते प्रयत्न करताना दिसत आहेत आणि त्यासाठीचा “बौद्धिक खुराक” हा रामचंद्र गुहांसारखे बुद्धिमंत त्यांना पुरवत आहेत.
हिंदू सत्य के रास्ते पर चलता है। हिंदुत्ववादी धर्म की आड़ में लूटता है। pic.twitter.com/Jycl211qut — Rahul Gandhi (@RahulGandhi) December 22, 2021
हिंदू सत्य के रास्ते पर चलता है।
हिंदुत्ववादी धर्म की आड़ में लूटता है। pic.twitter.com/Jycl211qut
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 22, 2021
अयोध्येतील जमिनी खरेदी, चारधाम जोडण्याच्या महामार्गांवरील पर्यावरण विषयक आक्षेप, त्यातून लष्कराच्या मुव्हमेंटला कसे अडथळे तयार होतील, याविषयीचे ट्विट रामचंद्र गुहा करतात आणि त्याचे अनुकरण काही वेळाने राहुल गांधी करताना दिसतात. दोघांच्या आक्षेपांमध्ये “विलक्षण समानता” आहे. याचा अर्थच हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यात भेद निर्माण करून सध्याच्या हिंदुत्ववादी सरकारला निदान हलवता येते का यातला हा प्रयत्न आहे.
हिंदू जागृत झाल्याचे हे लक्षण आहे. हिंदू समाजाला दुखावून आपल्या धर्मनिरपेक्षतेचे ढोल बडवून, बहुलतावादाच्या टिमक्या वाजवून यापुढे आपल्याला हवे तसे तथाकथित धर्मनिरपेक्ष राजकारण साध्य करता येणार नाही, हे या बुद्धिमंतांना आणि राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्यांनाही लक्षात आले आहे. त्यामुळेच ते “बौद्धिक खुराक” देऊन हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यात भेद कसा निर्माण करता येईल याचा विचार करून हिंदू धार्मिक स्थळांभोवतीच्या विविध विकास कामांवर तथाकथित पर्यावरणाच्या मुद्द्यावरून आक्षेप घेताना दिसत आहेत. हा देशातल्या बुद्धिमंतांचा नवा राजकीय पवित्रा आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App