विशेष प्रतिनिधी
मुंबई : नवाब मलिक यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना रस्त्यावर उतरली आहे.अशाच एका मोर्चात नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी अमृता फडणवीस यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. यावर राज्य महिला आयोगाने मात्र कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही . Insult to women in front of women! Offensive statement about Amrita Fadnavis! NCP district president leaves level; Will the state women’s commission take notice?
काय म्हणाले अशोक गावडे?
आमच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पत्नी अशा पध्दतीने कोठेही टीका करत नाही. परंतु ही डान्सबारमधली मात्र रस्त्यावर येऊन बोलते असे आक्षेपार्ह वक्तव्य गावडे यांनी केले. मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या धर्मपत्नीने कशा प्रकारचे वक्तव्य केले पाहिजे असे सांगत त्यांनी अक्कलही काढली. या आंदोलनावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्या देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मंदा म्हात्रेनी केला निषेध
राष्ट्रवादीचे अशोक गावडे यांच्या वक्तव्याचा भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे निषेध केला आहे. अशोक गावडे यांनी निदर्शने करता अपशब्द वापरले ते तोंडाने सांगूही शकत नाही. नवी मुंबईकरांच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करतो.
महिलांना अपशब्द वापरणे हे आपल्या कोणत्या संस्कृतीत आणि संस्कारात बसते? हे त्यांनी लोकांना सागितले पाहिजे. आता आम्ही त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार देणारच आहोत. त्यांच्यावर अनेक गुन्हे असतानाही आज ते नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत.
त्यांच्याविरोधात ज्या तक्रारी आहेत त्या काढल्या तर कोणताही पक्ष त्यांना जिल्हाध्यक्ष करू शकत नाही, असे मंदा म्हात्रे म्हणाल्या.
चित्रा वाघ यांनी ट्विट करुन आपला संताप व्यक्त केला आहे.
त्या म्हणाल्या, “अशोक गावडेची जीभ छाटा. राष्ट्रवादीचा नवी मुंबईचा हा हरामखोर जिल्हाध्यक्ष, कुठल्या मस्तीतं आहे? अमृता फडणवीस यांचा ज्या निचमनोवृत्तीने उल्लेख याने केला हे राष्ट्रवादीला मान्य आहे का? आणि यात कोणालाही महिलांचा अपमान, विनयभंग दिसत नाही का?” असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच नवी मुंबई पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणीही वाघ यांनी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App