विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. रशियाने गुरुवारी पहाटे युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश दिले. युक्रेनमध्ये मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थीही अडकले आहेत. ज्यांना गेल्या काही दिवसांपासून एअरलिफ्ट केले जात होते. आताही केंद्र सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी एक अॅडव्हायजरी जारी केली आहे.त्यासोबतच नवी दिल्ली येथे युक्रेन मधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि संबंधित माहिती देण्यासाठी कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे.Indian Government Control Room in New Delhi. In view of the prevailing situation in Ukraine, Control Room set up by India to provide information & assistance for Indian Nationals
Indian Government Control Room in New Delhi. In view of the prevailing situation in Ukraine, Control Room set up by India to provide information & assistance for Indian Nationals: 1800118797 (Toll free)+91-11-23012113+91-11-23014104+91-11-23017905 situationroom@mea.gov.in pic.twitter.com/1nRwbyKVcK — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) February 24, 2022
Indian Government Control Room in New Delhi. In view of the prevailing situation in Ukraine, Control Room set up by India to provide information & assistance for Indian Nationals:
1800118797 (Toll free)+91-11-23012113+91-11-23014104+91-11-23017905
situationroom@mea.gov.in pic.twitter.com/1nRwbyKVcK
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) February 24, 2022
युक्रेनमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना सांगितले आहे की, युक्रेनमधील सध्याची परिस्थिती अनिश्चित स्वरुपाची आहे. तुम्ही आता जिथे कुठे आहात तिथे शांततेत आणि सुरक्षितत राहा. मग ते तुमचे घर असो, वसतिगृह असो किंवा इतर कुठेही. युक्रेनची राजधानी कीवमधील भारतीय दूतावासाने अॅडव्हायजरी जारी करताना सांगितले की, ‘जो कोणी कीवला जात आहे, त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ शहरात परत जाण्याची सूचना केली जात आहे. याशिवाय इतर माहितीसाठी पुढील सूचना लवकरच जारी केल्या जातील.’
कीवमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, युक्रेनचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे विशेष उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांनी दूतावासाच्या वेबसाइट, सोशल मीडिया पोस्ट आणि नंबरवर संपर्क साधावा.
यासोबतच युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी सरकारने हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. हे टोल फ्री क्रमांक आहेत ज्याद्वारे सद्यस्थितीबद्दल अधिक माहिती मिळू शकते.
हेल्पलाइन क्रमांक
+38 0997300428
+38 0997300483
+38 0933980327
+38 0635917881
+38 0935046170
युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यामुळे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App