SA vs IND : दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३०५ धावांचं आव्हान;भारताचं पारडं जड

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरिअन कसोटी सामन्यात भारतीय संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली आहे.

आफ्रिकेला विजयासाठी ३०५ धावांचं आव्हान देण्यात भारतीय संघ यशस्वी झाला आहे. 


विशेष प्रतिनिधी

सेंच्युरियन: पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांनी सपशेल निराशा केली. कागिसो राबाडा, लुंगी निगीडी आणि मार्को जॅनसेन या त्रिकुटाच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा डाव १७४ धावात आटोपला. पहिल्या डावातील १३० धावांच्या आघाडीच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३०५ धावांचे लक्ष्य ठेवले. दुसऱ्या डावात भारताचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरु शकला नाही. India vs South Africa on centurion pitch 305 target is toughest challenge

आफ्रिकेला विजयासाठी ३०५ धावांचं आव्हान देण्यात भारतीय संघ यशस्वी झाला आहे. दुसऱ्या डावात भारताचा डाव १७४ धावांत गुंडाळण्यात आफ्रिकेला यश आलं. परंतू सेंच्युरिअनच्या खेळपट्टीचा अंदाज घेता अखेरचा दिवस मैदानात तग धरुन भारतीय गोलंदाजीचा सामना करणं हे आफ्रिकेसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

सेंच्युरियनच्या या पीचवर ३०५ धावांचे लक्ष्य इतके सोपे नाहीय. आतापर्यंतचा सेंच्युरियनचा इतिहास पाहिला तर कुठलाही संघ चौथ्या डावात २५० पेक्षा जास्त धावा करु शकलेला नाही.

आज भारतीय संघ लवकर ऑलआऊट झाला असला, तरी इथे फलंदाजी करणे इतके सोपे नव्हते.चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे या मधल्या फळीतीली फलंदाजांनी निराश केले. भारताकडून कुणीही अर्धशतकी खेळी केली नाही.

India vs South Africa on centurion pitch 305 target is toughest challenge

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात