INDIA IN MY VEINS ! आशा का अविरत..अविराम कल्याण यात्री…!10 दिवस 16 निर्णय ; भारताचा लढवय्या पंतप्रधान !


  • पंतप्रधान नरेंद्र मोदी : 20 तास काम- धडाकेबाज निर्णय अन् सकारात्मक परिणाम.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातले आहे.देशावर आलेल्या प्रत्येक संकटासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी  खंबीरपणे लढतात. त्यांच्या निर्णय क्षमतेची ताकद सर्व जगाने पाहिली आहे. कोरोना संकटातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गेल्या 10 दिवसात 16 महत्वाचे निर्णय घेतले आहेत.कठीण परिस्थितीत मोदी आणखी तत्पर होतात आणि देशहितार्थ घेतलेला प्रत्येक निर्णय सार्थ करून दाखवतात. INDIA IN MY VEINS ! Narendra Modi Government’s important 16 decisions in last 10 days

 

1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण

1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकसाठी 4500 कोटींचे कर्ज

सीरमसाठी 3,000 कोटी आणि भारत बायोटेकसाठी 1,500 कोटी रुपयांचे क्रेडिट दिले.लस उत्पादन वाढणार

ऑक्सिजनच्या औद्योगिक वापरावर बंदी

22 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत उद्योगांच्या ऑक्सिजन पुरवठ्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

Modi Govt Kept its word, maximum supply of Remedivir to Maharashtra, 4 lakh 35 thousand injections for ten days

 

रेमडेसिव्हीरची किंमत कमी आणि उत्पादन वाढ

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या किमतीत दोन दिवसांपूर्वी कपात.

ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय

अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. अशावेळी रेल्वे मंत्रालयाने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलिंडरचा देशाच्या विविध भागात पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतला.

तात्पुरत्या रुग्णालयांची उभारणी

दिल्लीच्या कँट, लखनऊमध्ये डीआरडीओ आणि छतरपूरमध्ये सैन्याने अशाप्रकारच्या रुग्णालयांची उभारणी केली आहे.

हाफकीनमध्ये कोव्हॅक्सिन निर्मितीला मान्यता

भारत सरकारने बायोटेक आणि आयसीएमआरद्वारे निर्मित कोव्हॅक्सिनच्या उत्पादनासाठी मुंबईतील हाफकीन संस्थेला परवानगी दिली .

परदेशी लसीला 3 दिवसांत मंजुरी

केंद्र सरकारने देशातील आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्यासाठी परदेशात निर्मित कोरोना लस अर्जाच्या तीन दिवसांच्या आत 15 एप्रिल रोजी मंजूर केली.

Central Govt Gives Quick approval for Jumbo Covid Center at BPCL refinery in Mumbai

BPCL जम्बो कोविड सेंटर

बीपीसीएलच्या मुंबईतील रिफायनरीत जम्बो कोविड सेंटर उभारण्यास तातडीने मान्यता दिली आहे.

PMCARES मधून देशभरात आणखी ५५१ ऑक्सिजन प्रकल्प

पीएम केअर्स फंडमधून पीएम मोदींनी संपूर्ण देशात 551 PSA मेडिकल ऑक्सिजन निर्मिती प्लांट लावण्याची घोषणा केली आहे. हे प्लांट सार्वजनिक रुग्णालयांत उभारले जातील.

महाराष्ट्राला रेमडेसिव्हिरचा सर्वाधिक पुरवठा, दहा दिवसांसाठी ४ लाख ३५ हजार इंजेक्शन्स

महाराष्ट्राला सर्वाधिक 34 टक्के म्हणजेच 1,65,800 इंजेक्शन्स मिळाले आहेत. याबरोबरच 21 ते 30 एप्रिल 2021 या दिवसांच्या काळासाठी राज्याला एकूण 4,35,000 इंजेक्शन्स मिळाले आहेत.

कोरोनावरील लसी-ऑक्सिजन-उपकरणांवरील सीमाशुल्क आणि आरोग्य सेस माफ

केंद्र सरकारनं कोरोनावरील लसी आणि ऑक्सिजनवरील आयातीवर लागणारे सीमा शुल्क आणि आरोग्य सेस तीन महिन्यांसाठी माफ केला आहे.ऑक्सिजनबरोबरच त्यासाठीचे जनरेटर, स्टोरेज टँक, फिलिंग सिस्टीम आणि कॉन्सन्ट्रेटर यांच्या आयातीवरही ही सूट लागू असणार आहे.

80 कोटी लाभार्थ्यांना मिळणार 2 महिने मोफत अन्नधान्य

मार्च 2020 मध्ये जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला आता आणखी दोन महिने वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. जेणेकरुन कोरोनाच्या या संकट काळात गरीब आणि वंचित लाभार्थ्यांना अन्नधान्याची कमतरता भासणार नाही .

 

परिक्षा रद्द

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली , तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

एअरलिफ्ट करून ऑक्सिजन- औषधांचा देशभरात पुरवठा 

ऑक्सिजन कंटेनर, सिलिंडर, आवश्यक औषधे, उपकरणांना एअरलिफ्ट करून आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवले जात आहे.

एका मिनिटात 1000 लिटर ऑक्सिजन, ‘तेजस’च्या तंत्रज्ञानाने ऑक्सिजनची निर्मिती.

वायुसेनेतील तेजस लढाऊ विमानात विकसित केलेली ‘ऑन-बोर्ड ऑक्सिजन जनरेशन सिस्टम’ (ओबीओजीएस) आता कोव्हिड च्या रूग्णांना ऑक्सिजन पुरवणार.  विशेष म्हणजे  तेजससाठी विकसित केलेली ‘ऑन-बोर्ड ऑक्सिजन जनरेशन सिस्टम’ (ओबीओजीएस) प्रति मिनिट 1000 लिटर ऑक्सिजन तयार करू शकते.

INDIA IN MY VEINS ! Narendra Modi Government’s important 16 decisions in last 10 days

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था