विशेष प्रतिनिधी
सांगली : सांगली आणि मिरजेतील पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीवाडी व कृष्णा घाट मिरज येथे प्रत्येकी २ बोट व रेस्क्यू टिम तैनात करण्यात आली आहेत. या टीमकडून नागरिकांसाठी मदतकार्य आणि बचाव कार्य केले जाणार आहे. यासाठी सांगली आणि मिरजेत अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान , आपत्ती मित्र कार्यरत आहेत.
कृष्णा नदीची पाणीपातळी सांगली शहरात ४९ फुटा पर्यंत पोहचल्यानंतर ज्या नागरी वस्त्यांमध्ये पुराचे पाणी जात आहे आणि नागरिकांना बाहेर पडणेची अडचण होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयुक्त कापडणीस यांनी तातडीने निर्णय घेत सांगली शहर आणि सांगलीवाडीमध्ये 2 आणि मिरज कृष्णा घाट परिसरात 2 अशा रेस्क्यू टीम बोटीसहित तैनात केल्या आहेत. या रेस्क्यू टीम साठी अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे हे प्रमुख असून ज्या भागात पाणी आले आहे आणि नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद पडली आहे अशा ठिकाणी ही टीम जाऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करणार आहे. रेस्क्यू टीम मुळे पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना मोठी मदत होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App