चीनमध्ये उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शोधले जाताहेत कट्टर मुस्लिम, अटक करून शिबिरांमध्ये रवानगी

चीनमधील कम्युनिस्ट सरकारकडून उईघर मुस्लिमांवर अत्याचार करण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. डाटाचा वापर करून कट्टर मुस्लिम शोधले जात असून त्यांची रवानगी दूरवरच्या शिबिरांमध्ये केली जात आहे.


वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : चीनमधील कम्युनिस्ट सरकारकडून उईघर मुस्लिमांवर अत्याचार करण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. डाटाचा वापर करून कट्टर मुस्लिम शोधले जात असून त्यांची रवानगी दूरवरच्या शिबिरांमध्ये केली जात आहे.

न्यूयॉर्क येथील मानवाधिकार वॉच या (ह्युमन राईटस वॉच) या संस्थेच्या अहवालानुसार चीनमध्ये उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून कॉम्प्युटर प्रोग्राम तयार करण्यात आला आहे. यामध्ये धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करणारे, धार्मिक ओळख दर्शविणारा पेहराव करणारे आणि परदेशात प्रवास करून आलेल्या मुस्लिमांना शोधण्यासाठी प्रोग्राम आहे. या पध्दतीने लोकांना निवडून त्यांची रवानगी दूरवरच्या शिबिरांमध्ये केली जात आहे. एचआरडब्ल्यूला या पध्दतीने बनविलेली दोन हजार मुस्लिमांची एक यादीच मिळाली आहे.

चीनमध्ये या पूर्वी उईघर तसेच तुर्की मुस्लिमांवर जघन्य अत्याचार सुरू आहेत. सुमारे दहा लाख उईघर मुस्लिम चीनमध्ये कैदेत आहेत. मुस्लिम महिलांचे जबरदस्तीने गर्भपात केले जात आहेत. चीन कम्युनिस्ट पक्षाच्या मते, इस्लाम हा एक मानसिक आजार आहे. हा पंथ पाळणाऱ्यांना उपचारांची गरज आहे.

म्हणून उईघर मुस्लिमांना इस्लामविरोधी शिबिरांमध्ये डांबून ठेवले जात आहे. चीनमध्ये उईघर मुस्लिमांवर अत्याचार सुरू असल्याची माहिती पहिल्यांदा 2018 मध्ये जगासमोर आली. हजारो उईघरांना चीनमधील बंदी शिबिरांमध्ये डांबण्यात येत होते.

भारतातील मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा कांगावा करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान याबाबत काहीही बोलण्यास तयार नाहीत. चीनमध्ये मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याबाबत त्यांनी कानावर हात ठेवले आहेत.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात