सध्याच्या काळात व्यक्तिमत्व विकासामध्ये कल्पनाशक्तीच्या विकासाला अनन्यसाधारण महत्व आलेले आहे. कोणतीही कल्पना प्रत्यक्षात उतरण्याआधी ती मनात साकारावी लागते. कल्पनेच्या कोंदणात तिला आधि विस्तारीत करावे लागते. त्यामुळे या बाबी आधि नीट समजावून घेतल्या पाहिजेत.Improve imagination performance
कल्पनाशक्तीची कामगिरी हे व्हिजन विशालतेच्या मानसिकतेवर आधारलेले आहे. अशी मानसिकता की जी शिकणे, विसरणे आणि पुन्हा शिकणे या निरंतर चालणा-या चक्रावर झाले आहे आणि जे सतत नाविन्यतेने सक्षम झाले आहे.
अनिर्बंध विचारांना अधिकाधिक वाव देण्यासाठी लोकांनी भीतीने भारलेल्या मानसिकतेचा जागरूकतेने त्याग करायला हवा. या व्यतिरिक्त विशाल मानसिकता असलेले लोक नवनव्या संधी तसेच शक्यतांना आपल्या मनात सामावून घेत त्या दिशेने कोणतेही पूर्वग्रह न ठेवता वाटचाल करत राहतात. त्यामुळे मन सतत ताजेतवाने राहून त्यामुळे मेंदू अधिकाधिक तरल आणि सक्रिय राहण्यास मदत होते. विशाल मानसिकता हा केवळ पाया असून कल्पनाशक्तीसाठी तोच पुरेसा नाही.
नवनवीन गोष्टी शिकण्याच्या तीव्र इच्छेद्वारे त्याची मशागत होणे गरजेचे आहे. ज्यांना सतत प्रश्न पडत असतात, ज्यांची निसर्गतःच चौकसबुद्धी अशा लोकांमध्ये शिकण्याची प्रक्रिया वेगाने होते. तर ज्यांची बालसुलभ चौकसबुद्धी लोप पावली आहे त्यांना प्रौढपणातही त्यावर मेहनत घेऊन ती अवस्था पुनःप्राप्त करता येऊ शकते. अप्रचलित तत्त्वज्ञान न शिकण्याच्या आव्हानात्मक उद्दिष्टासाठी चौकसबुद्धी उत्प्रेरक ठरते. कारण त्यामुळे कालबाह्य ठरलेले उद्योग प्रारूपे आणि सामाजिक समतेच्या पुरातन कल्पनांचा पुनर्वापर करणे सोयीचे होते. अंतिमतः कल्पनाशक्ती कामगिरीच्या सर्वोच्च शिखरावर राहणे ही प्रत्यक्षात अनुभवायची गोष्ट आहे आणि त्यासाठी ते प्रत्यक्षात आणण्याची गरज आहे.
कल्पनाशक्तीची ताकद एकवटण्यासाठीची उद्योग क्षेत्रातील उदाहरणे आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यासाठी काही विशिष्ट पदार्थांचे आपण जसे सेवन करतो त्याचप्रमाणे अचाट कल्पना या कल्पनाशक्तीसाठी पूरक अन्न ठरतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App